Join us

birthday special: दीपिका नाही तर हिच्यासाठी वेडा झाला होता रणवीर सिंग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 11:18 IST

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे बॉलिवूड कपल सध्या त्यांच्या संसारात आनंदी आहे. पण रणवीर एकेकाळी...

ठळक मुद्देअहाना ही धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी यांची लहान मुलगी.

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक हिरो रणवीर सिंग याचा आज वाढदिवस. आज रणवीर त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे बॉलिवूड कपल सध्या त्यांच्या संसारात आनंदी आहे. पण रणवीर एकेकाळी धर्मेन्द्रच्या मुलीच्या प्रेमात वेडा होता. होय, कॉलेजच्या दिवसांत रणवीर अभिनेता धर्मेन्द्र्र यांची मुलगी अहाना हिच्या प्रेमात होता. पण याचदरम्यान अहानाना दुस-या एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासाठी तिने रणवीरला सोडले. होय, रणवीर अहानाच्या प्रेमात होता आणि अहाना आदित्य राय कपूरवर भाळली होती. आदित्यसाठी अहानाने रणवीरला डिच केले आणि या लव्हस्टोरीला ब्रेक लागला.

खुद्द रणवीरने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ‘ज्युनिअर कॉलेजमध्ये ती प्रत्येक मुलाची फँटसी होती. तिच्यासाठी मी 4-5 वर्षे अक्षरश: वेडा झालो होतो. आज ती विवाहित आहे. मी तिच्यावर भाळलो होतो आणि ती आदित्य राय कपूरवर. अखेर एक दिवस आमचे ब्रेकअप झाले. ती आदित्यसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे मला कळले होते,’असे रणवीरने या मुलाखतीत  सांगितले होते. ही मुलगी अहाना होती.

ब्रेकअपनंतर रणवीर शिकण्यासाठी विदेशात केला. पुढे चित्रपटात आला. दुसरीकडे अहाना दिल्लीचा बिझनेसमॅन वैभव वोहरासोबत लग्न करून मोकळी झाली.

अहाना ही धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी यांची लहान मुलगी. मोठी बहीण ईशा देओलपेक्षा ती पाच वर्षांनी लहान आहे. ईशाप्रमाणेच अहाना हिनेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. ‘तुम जानो न हम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात तिने ईशा देओच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. पण यानंतर अहानाने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. साहजिकच बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून ती दूर झाली.

टॅग्स :रणवीर सिंग