BIRTHDAY SPECIAL: पाहा सुशांत सिंग राजपुतच्या बालपणातील दुर्मिळ फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:45 IST
सुशांत सिंग राजपूतची बॉलीवूड सक्सेस स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. लहान शहरातून येऊन त्याने छोट्या पडद्यावरून सुरूवात केली ...
BIRTHDAY SPECIAL: पाहा सुशांत सिंग राजपुतच्या बालपणातील दुर्मिळ फोटो
सुशांत सिंग राजपूतची बॉलीवूड सक्सेस स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. लहान शहरातून येऊन त्याने छोट्या पडद्यावरून सुरूवात केली आणि थोड्याच कालावधीमध्ये मोेठा पडदाही काबीज केला. टीव्ही स्टार ते मुव्ही स्टार असा त्याचा प्रवास तर सर्वांनाच माहित आहेत. परंतु या झगमगाटाच्या दुनियेत येण्यापूर्वीचा सुशांत कसा होता याविषयी त्याच्या डाय हार्ड फॅन्सनादेखील फार कमी माहिती आहे.आज त्याच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त हीच आतापर्यंत कधीही न बाहेर आलेली माहिती तुम्हाला देत आहोत. बालपणी आपला लाडका सुशांत कसा दिसत होता हे पाहण्यासाठी त्याचे काही अत्यंत ‘दुर्मिळ’ फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याच्या वाढत्या वयातील काही महत्त्वाच्या क्षणी टिपलेले हे फोटोज् पाहुन त्याच्याविषयीचे प्रेम नक्कीच वाढेल, अशी आमची खात्री आहे. अभ्यासात अत्यंत हुशार सुशांत एआयईईई टॉपर होता. परंतु अभिनयाच्या ओढीने त्याने शिक्षण अर्धवट सोडले. विशेष म्हणजे त्याने इंजिनिअरिंगच्या ११ राष्ट्रीय प्रवेश परीक्षा पास केल्या होत्या. त्यामध्ये धनबाद येथील ‘इंडियन स्कूल आॅफ माईन्स’चादेखील समावेश आहे. यावरून त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची कल्पना येते.► ALSO READ: ‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसीचांगला अभिनेत्याबरोबरच तो उत्तम डान्सरदेखील आहे. विविध डान्स रिअॅलिटी शोवर त्याने त्याच्या नृत्यकौशल्याची झलकदेखील दाखवलेली आहे. पूर्व गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह त्याने ‘झलक दिखला जा ४’मध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या या सिक्रेट स्कीलचे कारण म्हणजे तो शामक दावर यांचा विद्यार्थी होता. अनेक पुरस्कार सोहळ्यात तो बॅकग्राउंड डान्सर म्हणून नाचलेला आहे. सुशांतने त्याचे अभिनयातील करिअर टीव्ही सिरीयल ‘पवित्र रिश्ता’ने सुरू केले. पाहता पाहता ही मालिका आणि सुशांत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. पण एवढ्यावर त्याचे समाधान होणार नव्हते. सर्वोच्च ‘टीआरपी’ असताना त्याने सिरीयल सोडली आणि मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न गाठण्यासाठी तो निघाला.►ALSO READ: सुशांत सिंग राजपुतने ‘बेफिक्रे’ का केला नसता?बऱ्याच जणांना त्याचा हा निर्णय ‘मुर्खपणा’चा वाटला. छोट्या पडद्यावर एवढी लोकप्रियता मिळवल्यावर चित्रपटांमध्ये त्या चेहऱ्याला प्रेक्षक स्वीकारत नाही अशी सर्वसाधरण धारणा आहे. पण यामुळे त्याचा आत्मविश्वास काही कमी झाला नाही. तो जिद्दीने मेहनत करू लागला. ‘काय पो चे’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. तेव्हापासून त्याने मागे वळून कधी पाहिलेच नाही. गेल्या वर्षी ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित सिनेमात काम करून त्याने करिअर बेस्ट परफॉर्मन्स दिला. सोलो हीरो म्हणून त्याचा हा पहिला शंभर कोटी कमवणारा चित्रपट ठरला. यानंतर तो आता क्रिती सेननसोबत ‘राबता’ चित्रपटात दिसणार असून त्यानंतर ‘चंदा मामा दूर के’ या स्पेस अॅडव्हेंचर सिनेमातही झळणार आहे. त्यासाठी तो बोर्इंग विमान उडवण्याचीही ट्रेनिंग घेत आहे.त्याचा करिअर ग्राफ सतत उंचावत राहो अशी ‘सीएनएक्स मस्ती’कडून त्याला शुभेच्छा! हॅपी बर्थडे सुशांत!►ALSO READ: क्रिती सॅननमुळेच झाले होते का सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडेचे ब्रेकअप?