Birthday Special : पाहा, ग्लॅमरस बर्थ डे गर्ल मलायका अरोराचा हॉट अवतार...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 10:54 IST
बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल मलायका अरोरा खान हिचा आज (23 आॅगस्ट) वाढदिवस आहे. ‘छैय्या छैय्या’ ते ‘मुन्नी बदनाम हुई’ ...
Birthday Special : पाहा, ग्लॅमरस बर्थ डे गर्ल मलायका अरोराचा हॉट अवतार...!
बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल मलायका अरोरा खान हिचा आज (23 आॅगस्ट) वाढदिवस आहे. ‘छैय्या छैय्या’ ते ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम नंबर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाने मॉडेलिंगपासून सुरुवात केली. डान्सर, व्हिजे, होस्ट, अभिनेत्री अशा अनेक रूपात ती बॉलिवूडमध्ये वावरतेय. ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाला ‘दिल से’या सिनेमातील ‘छैय्या छैय्या’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर्ससोबत कॅमिओ रोल्स केले. तिच्यावर चित्रीत झालेले अनेक डान्स नंबर्स पॉप्युलर झाले. आज जाणून घेऊ या मलायकाबद्दल अशाच काही गोष्टी... मलायकाचा जन्म २३ आॅगस्ट १९७३ रोजी मुंबईत एका पंजाबी कुटुंबात झाला. मलायकाचे वडील मर्चंट नेव्हीत सर्व्हिसला होते. तिची बहीण अमृता अरोरासुध्दा बॉलिवूड अभिनेत्री आहे. मलायकाचे शिक्षणदेखील मुंबईतच झाले. शालेय शिक्षण मुंबईच्या चेंबूर स्थित स्वामी विवेकानंद शाळेतून तर पदवी शिक्षण जय हिंद कॉलेजामधून पूर्ण केले. अरबाज-मलायकाची लव्ह स्टोरीमलायका अरोरा खानचे लग्न सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानसोबत झाले होते. या दोघांची लव्ह स्टोरी रंजक आहे. १९९३ मध्ये ‘मिस्टर कॉफी’च्या जाहिरातीसाठी मलायका आणि अरबाजला साइन करण्यात आले होते. ही जाहिरात एवढी बोल्ड होती, की त्यामुळे वादंग उठले होते. या वादातच मलायका आणि अरबाज यांचे सूत जुळायला सुरुवात झाली. दोघे बराच वेळ एकत्र घालवू लागले. त्यानंतर हे दोघे काही अल्बम्समध्येही झळकले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर १९९८ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे लग्नासाठी मलायकाने अरबाजला प्रपोज केले होते. खुद्द मलायकाने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. मी व अरबाज आम्ही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. पण लग्नासाठी अरबाजने नाही तर मी त्याला प्रपोज केले होते, असे मलायकाने सांगितले होते. मलायका व अरबाज हे बॉलिवूडचे एक रोमॅन्टिक कपल होते. पण १८ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर मलायका व अरबाज यांनी अचानक घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अर्थात घटस्फोटानंतरही मलायका व अरबाज दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अर्जून कपूरसोबत जोडले गेले नावअरबाजसोबत घटस्फोट घेतला त्यादरम्यान मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडले गेले. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या. ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती. कारण अर्जुन कपूरचे कुटुंब आणि सलमानचे कुटुंब यांच्यात घनिष्ट संबंध होते. शिवाय अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता हिला अनेक वर्ष डेट करत होता. अर्जुन कपूरमुळेच अरबाज व मलायका यांच्या अंतर वाढल्याचेही मानले जाते. बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल मलायका व अरबाजचा १६ वर्षांचा मुलगा आहे. मात्र तिच्याकडे पाहिल्यानंतर असे अजिबात वाटत नाही. या वयातही मलायकाने स्वत:ला अगदी फिट ठेवले आहे. मायानगरीच्या ग्लॅमरस जगात टिकून राहण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे आणि मलायकाने हे महत्त्व ओळखून स्वत:ला फिट ठेवले आहे.