Join us
Daily Top 2Weekly Top 5

birthday special :अमृता सिंहला भेटायला इतका उतावीळ होता सैफ अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 11:34 IST

अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या  ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे सैफ चर्चेत आहे. गेल्या वर्षांत सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही़.

अभिनेता सैफ अली खान याचा आज (१६ आॅगस्ट) वाढदिवस. सध्या  ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे सैफ चर्चेत आहे. गेल्या वर्षांत सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही़. तसेही  सैफ अली खान  फिल्मी लाईफपेक्षा त्याच्या रिअल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिला.  फिल्मी करिअरपूर्वी लग्नबंधनात अडकणा-या काही निवडक अभिनेत्यांपैकी सैफ एक. सैफने कमी वयात  लग्नच केले नाही तर, केवळ 23 वषार्चा असताना तो पहिल्यांदा वडीलही झाला. १९९१ मध्ये त्याने स्वत:पेक्षा १३ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहसोबत लग्न केले. सारा ही सैफ अली खानची थोरली मुलगी. १९९३मध्ये जन्मलेली सारा ही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांची मुलगी आहे.साराच्या जन्मानंतर म्हणजे आठ वर्षांनी म्हणजे २००१ साली सैफ आणि अमृता यांचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला आणि पुढे २००४ मध्ये सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला.   इटलीची मॉडेल रोजा हिच्यासोबतचे सैफचे अफेअर हे या घटस्फोटामागचे मुख्य कारण असल्याचे म्हटले जाते.

सैफ व अमृताची पहिली भेट १९९२ मध्ये झाली. त्यावेळी अमृता यशाच्या शिखरावर होती आणि सैफ ‘बेखुदी’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक राहुल रवैल अमृताचा मित्र होता. त्यामुळे ‘बेखुदी’च्या स्टारकास्टसोबत अमृताचे एक फोटोशूट व्हावे, अशी त्याची इच्छा होती. याच फोटोशूटदरम्यान अमृता व सैफची पहिली ओळख झाली. या फोटोशूटदरम्यान सैफ अमृताबरोबर जरा जास्तचं फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत होता. अमृताने ही गोष्ट हेरली होती. अमृताला भेटायला सैफ इतका उतावीळ झाला होता की, त्यानेच फोन करून तिला दुस-यांदा भेटण्याची गळ घातली होती. सैफ डिनरसाठी विचारतोयं हे पाहून अमृता अवाक् झाली होती. पण अमृताने बाहेर डिनरला जाण्यास नकार दिला. त्याऐवजी तिने सैफलाचं घरी डिनरसाठी येण्याचे निमंत्रण दिले. मग काय सैफ एका पायावर तयार झाला. तो अमृताच्य घरी पोहोचला तेव्हा अमृताच्या चेह-यावर जराही मेकअप नव्हते ही गोष्ट सैफला खूप भावली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला. या डिनरनंतर सैफ दोन दिवस अमृताकडेचं राहिला, असे म्हटले जाते. या दोन दिवसांत दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. सैफपेक्षा अमृता १३ वर्षांनी मोठी होती. पण वय त्याच्या नात्यात आडवे आले नाही. खरे तर लग्नाचा निर्णय अमृतासाठी खूप मोठा होता. कारण त्याकाळी ती आघाडीची नायिका होती. पण तिने सैफसाठी धोका पत्करला आणि दोघांचेही लग्न झाले. अर्थात हे लग्न केवळ १२ वर्षे टिकले. या घटस्फोटाचे सगळ्यांत मोठे कारण होते, सैफचे अफेअर्.

काही दिवसांपूवर्र सैफची अनेक वर्षांपूवीर्ची एक मुलाखत  सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात सैफने त्याची पहिली पत्नी अमृताबाबत धक्कादायक खुलासे केले होते.अमृता ही मला वारंवार नालायक म्हणून हिणवायची.   माझी आई आणि बहिणीचाही सारखा अपमान केला जायचा. त्यांना टोमणे मारणे, अपमान करणे असे प्रकार सुरू असायचे. मी हे सर्व सहन केले आहे. पण आता यातून बाहेर आल्यासारखे वाटते, असे अमृतासोबतच्या घटस्फोटासंदर्भात सैफ बोलला होता. अर्थात मी मोठ्या धाडसाने वेगळा होण्याचा निर्णय घेतला. पण अमृता कायम माज्या आयुष्याचा एक भाग राहील. तिने आणि माज्या मुलांनी नेहमी आनंदी राहावे असे मला वाटते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता.  

'अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफने करिना कपूरसोबत लग्न केले. ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील प्रेम बहरले. अनेक वर्षे डेटींग केल्यानंतर २०१२ मध्ये सैफने स्वत:पेक्षा दहा वर्षे लहान असलेल्या करिनासोबत संसार थाटला. 

टॅग्स :सैफ अली खान