Birthday Special : ‘सुपरस्टार’पेक्षा कमी नाही, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 11:18 IST
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान आज (२२ मे) आपला १७ वा वाढदिवस साजरा करते आहे. ...
Birthday Special : ‘सुपरस्टार’पेक्षा कमी नाही, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान आज (२२ मे) आपला १७ वा वाढदिवस साजरा करते आहे. निश्चितपणे सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण पापा शाहरूख मात्र याबाबतीत ठाम आहे. माझ्या मुलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटात यावे, असे शाहरूखने स्पष्ट केले आहे. शाहरूखची तिन्ही मुले आर्यन, सुहाना व अबराम तिघेही लोकप्रीय स्टारकिड्स आहेत. सोशल मीडियारवर यांचा फोटो पोस्ट होण्याची देर की तो फोटो व्हायरल झालाच म्हणून समजा. तर आम्ही बोलतोय, ते शाहरूखची प्रिन्सेस सुहाना खान हिच्याबद्दल. तिचे काही कूल फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. १७ वर्षांच्या सुहानाचा आत्तापासून फिल्मी ग्रूपमध्येही वावर आहे. करण जोहरच्या घरची पार्टी असो किंवा मग अनेक इव्हेंट सुहाना याठिकाणी दिसलीय. वरूण धवन व शाहरूखसोबत सुहानाचा असाच एक क्यूट फोटो. सुहानाचा हा ताजा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. यात ती कमालीची ग्लॅमरस दिसतेय. सोबत स्टाईलिशही. सुहाना अन्य स्टारकिड्सप्रमाणे पार्टी करताना वा मित्रांसोबत फिरताना दिसत नाही. कदाचित त्याचमुळे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. शाहरूखची तिन्ही मुले त्याच्यासारखी आहेत. सुहानाची स्माईल आणि तिचे डोळे दोन्ही एकदम शाहरूखसारखी आहेत. सुहानाची आई गौरी खान ही तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सुहानाच्या सुंदर व स्मार्ट दिसण्यामागचे कारण त्यामुळे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. सुहानाचे मित्र-मैत्रिणी कितीही ग्लॅमरस का असोत, सुहाना मात्र नेहमीच कूल राहणे आवडते. ग्लॅमर व स्टाईलशिवाय सुहाना खेळात चॅम्पियन आहे. पापाप्रमाणे तिला फुटबॉल खेळणे आवडते.