Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे स्पेशल : फरहान अख्तरचे १० प्रेरणादायी डायलॉग्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 15:22 IST

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, होस्ट, गायक, निर्माता, समाजसेवक अशा विविध भूमिकांमधून फरहान अख्तरने मागच्या १६ वर्षांमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले ...

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, होस्ट, गायक, निर्माता, समाजसेवक अशा विविध भूमिकांमधून फरहान अख्तरने मागच्या १६ वर्षांमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे. या ‘मल्टी टॅलेंटेड’ कलाकाराचा आज वाढदिवस. हाती घेतलेले प्रत्येक काम तो शंभर टक्के मेहनत घेऊन पूर्वत्वास नेतो.हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथाकार जावेद अख्तर यांचा मुलगा असणारा फरहान आजच्या युवकांचे प्रतिनिधित्व करतो. ‘दिल चाहता है’ या पदार्पणाच्या सिनेमातूनच त्याने नव्या काळातील तरुणांना आवाज दिला. तेव्हापासून त्याने जी प्रेक्षकांची नस पकडली आहे ती आजतागायत तशीच आहे.‘रॉक आॅन’मुळे त्याच्या आवाजाची जादू सर्वांना अनुभवायला मिळाली. ‘भाग मिल्खा भाग’सारख्या सिनेमातून त्याचे जबरदस्त अभिनयकौशल्य दिसून आले. ‘डॉन’ सिरीजच्या निमित्ताने त्याने जुन्या सिनेमाला मॉडर्न टच दिला. असे सगळे करत असताना त्याच्या लिखाणाचे मात्र पाहिजे तेवढे कौतुक झाले झाले नाही.वडिल जावेद अख्तर यांनी बॉलीवूडमध्ये अनेक अजरामर डायलॉग्स लिहिले. तेच गुण फरहानमध्येदेखील आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही प्रेरणादायी डॉयलॉग्सची उजळणी करीत आहोत.बॉलीवूडच्या या हरहुन्नरी कलाकाराला ‘सीएनएक्स मस्ती’कडून खूप खूप शुभेच्छा!मल्टी टॅलेंटेड : फरहान अख्तर१. अपने रास्ते चलते रहो, चलते रहो. धीरे धीरे सारी दुनिया तुम्हारे रास्ते पर आ जाएगी - लक बाय चान्स२. इन्सान को डिब्बे में सिर्फ तब होना चाहिए जब वो मर चुका हो - जिंदगी ना मिलेगी दोबारा३. जिंदगी में अक्सर कुछ ज्यादा पाने की चाह में हम वो खो देते है जो हमारे पास है. - शादी के साईड इफेक्ट्स४. तुम इतनी स्मार्ट होते हुए इतनी स्टुपिड कैसे हो सकती हो? - दिल धडकने दो५. मौके मिलते नहीं बनाए जाते है. कामयाबी हम तक नहीं, हमें कामयाबी तक जाना होता है. - लक बाय चान्स६. ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते है. - लक्ष्य७. डॉन अपने दोस्तों का हाल पुछे ना पुछे, अपने दुश्मनों की खबर हमेशा रखता है - डॉन २८. हम होंगे, लाईट्स होगी, एक ह्युज आॅडियन्स होगी...और होगी म्युझिक जिसके हर बीट में, हर नोट में जिंदगी होगी...जिंदगी - रॉक आॅन९. बात तो तुम्हे भी साफ नजर आनी चाहिए, लेकिन उसके लिए तुम्हे अपने ये रॉकस्टार शेड्स उतारने पडेंगे. - रॉक आॅन१०. क्या तुम मेंटली चॅलेंजड् हो माय ब्वॉय? - जिंदगी ना मिलेगी दोबारा