Join us
Daily Top 2Weekly Top 5

BIRTHDAY SPECIAL : ​तनुश्री दत्ताबद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 10:39 IST

‘आशिक बनाया आपने’(2005) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दिर्घकाळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. आज तनुश्रीची आठवण होण्याचे ...

‘आशिक बनाया आपने’(2005) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता दिर्घकाळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. आज तनुश्रीची आठवण होण्याचे कारण, आज (19मार्च) तिचा वाढदिवस. अलीकडेच तिची धाकटी बहीण इशिताने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यात तनुश्रीचा बदलेला लूक दिसून येत आहे. तनुश्रीचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा ‘रामा: दे सेवियर’ (2010) होता. तिने ‘चॉकलेट : डीप डार्क सीक्रेट्स’, ‘ढोल’ आणि ‘गुड ब्वॉय बॅड बॉय’सह अनेक सिनेमांत काम केले आहे. ‘आशिक बनाया आपने’ सिनेमात तनुश्रीने बोल्ड अंदाज दाखवला होता. या सिनेमात तिच्या अपोझिट सीरिअल किसर इमरान हाश्मी होता. तनुश्रीने मोजक्या सिनेमांत काम करून सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र, ती अद्याप अविवाहितच आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तनुश्रीने शिक्षण अर्धवट सोडले. बीसीएमचे पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर तिने कॉलेजला रामराम ठोकला. तनुश्रीची बहीण इशिता दत्ता ही सुद्धा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.19 मार्च 1984ला जमशेदपूर, झारखंडमध्ये जन्मलेल्या तनुश्रीने 2004मध्ये फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब नावी केला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी तनुश्रीने इंडियन पॉन म्युझिक व्हिडिओ ‘सैय्या दिल में आना रे’मध्ये काम केले होते. हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रीय झाला होता. यानंतर २००३ मध्ये तिने अनेक शोमध्ये तिने प्रस्तूती दिली. अभिनेता होण्यासोबतच तनुश्री एक गायिका सुद्धा आहे.तनुश्री दत्ता आताश: पुरती बदललेली आहे. अलीकडे तिचे काही फोटो शेअर केले गेलेत. यात तनुश्री एकदम वेगळी दिसतेय.