Join us

​Birthday special : अलका याज्ञिकने गायलेल्या ‘या’ गाण्यावरून झाले होते मोठे वादंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 11:46 IST

अलका याज्ञिक म्हणजे बॉलिवूडची एक लोकप्रीय पार्श्वगायिका. आज अलका याज्ञिकचा वाढदिवस( २० मार्च). यानिमित्त जाणून घेऊ यात, तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी...

अलका याज्ञिक म्हणजे बॉलिवूडची एक लोकप्रीय पार्श्वगायिका. आज अलका याज्ञिकचा वाढदिवस( २० मार्च). यानिमित्त जाणून घेऊ यात, तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी...- कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिकने वयाच्या ६व्या वषार्पासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. १९७२ पासून ती आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने म्हणत असे. वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईमध्ये दाखल झालेल्या अलका याज्ञिकला वयाच्या १४ व्या वर्षीच पहिला ब्रेक मिळाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.एका भेटीत राज कपूर यांना अलकाचा आवाज अतिशय आवडला. त्यांनी अलकाची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत भेट घालून दिली. यानंतर १९८० मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी अलकाला मिळाली. यावेळी ती केवळ १४ वर्षांची होती.यानंतर आठ वर्षांनी आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक, दो, तीन...’ हे गाणे अलकाला मिळाले. या गाण्याने अलकाला एक नवी ओळख दिली. यानंतर गायिका म्हणजे अलका याज्ञिक असे समीकरण जणू रूढ झाले. आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अलकाने   ७०० चित्रपटांत २० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.१९८९ मध्ये अलकाने नीरज कपूरशी लग्न केले. अलका याज्ञिक गेल्या काही काळापासून बॉलिवूडपासून काहीशी फटकून वागताना दिसतेय. याचे कारण म्हणजे, आजच्या बदलत्या काळातील संगीताबद्दलचा तिचा उदासीन भाव. अलका याज्ञिकने हिंदी व्यतिरिक्त गुजराती, अवधी, उडिया, आसामी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळी व इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.१९९३ मध्ये आलेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील अलकाने गायलेल्या ‘चोली के पिछे क्या है...’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सुमारे ४२ राजकीय पक्षांनी या गाण्याविरोधात आंदोलन छेडले होते. याच गाण्यासाठी   बेस्ट सिंगरचा अवार्ड इला अरूण आणि अलका याज्ञिक यांना दोघींना दिला गेला होता. असे बॉलिवूडच्या इतिहासात प्रथमच घडले होते.