Join us

Birthday special : अभिषेकच्या बर्थ डेला बिग बी अमिताभ बच्चनने शेअर केल्या भावनिक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 20:00 IST

अभिनेता अभिषेक बच्चन याने रविवारी (दि.५) त्याचा ४१वा वाढदिवस फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन हे खूपच ...

अभिनेता अभिषेक बच्चन याने रविवारी (दि.५) त्याचा ४१वा वाढदिवस फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन हे खूपच भावूक झाल्याचे बघावयास मिळाले. त्यांनी ट्विटरवर अभिषेकच्या लहानपणीचे काही फोटोज् शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अभिषेकला शुभेच्छा देताना त्यांनी लिहिले की, ‘चेल्सियाचा विजय, मुलीचे फेव्हरेट पिज्जा ठिकाण, १२वा जन्मदिवस, आणखी एक वर्ष संपले, अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अभिषेकचे लहानपणीचे काही फोटोही त्यांनी शेअर केले. वास्तविक अभिषेक हा वडील अमिताभ यांच्या खूपच क्लोज असल्याने प्रत्येक ‘बर्थ डे’ तो न विसरता आपल्या फॅमिलीबरोबर साजरा करीत असतो. अमिताभदेखील त्याच्या बर्थ डेचे औचित्य साधून सेलिब्रेशनची एकही संधी सोडत नसतात. मात्र यावेळचा अभिषेकचा बर्थ डे खूपच स्पेशल असल्याचे दिसून आले. कारण अमिताभ यांनी त्यांच्या आॅफिशियल ब्लॉगवर मनाला भिडणारी बाब त्यांच्या वाचकांसोबत शेअर केली. त्यांनी लिहिले की, मी बच्चनजी यांच्या मुलाच्या रूपात जन्माला आलो. मी त्या शब्दाची स्पेलिंग समजण्याअगोदरच सेलिब्रेटी बनलो. अभिषेकचा जन्म अमिताभ बच्चनच्या मुलाच्या रूपात झाला. तो माझ्यासारखाच सेलिब्रेटी बनला.  आता माझा मुलगा ४१ वर्षांचा झाला आहे. वर्षांमागे वर्ष कसे गेले याची मी कल्पनाही केली नाही... ब्रीच कॅँडी हॉस्पिटलमध्ये लेबर पेनने तडफणाºया जयाचे ते काही तास... मध्येच रुमचा दरवाजा उघडणे... दरवाजामधूनच डोकावत डॉक्टर शहाला मी विचारणे, काय हवंय? त्यांनीही हसतमुखाने मुलाचा जन्म झाल्याचा इशारा करणे सर्वकाही स्वप्नवत आहे. जेव्हा मी अभिषेकला घेऊन घरी पोहचलो होतो तेव्हा श्वेता आनंदाने ओरडत त्याच्याकडे आली. भाऊ-बहिणीचे ते प्रेम कुटुंबात आनंद निर्माण करणारे होते. पुढे अमिताभने लिहिले की, जया संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आहे. त्यामुळे मी रात्री बारा वाजता ऐश्वर्या आणि श्वेतासोबत अभिषेकचा बर्थ डे बर्फी केक कापून सेलिब्रेट केला. तसेच अभिषेकला गिफ्टही दिलेत. एक वर्ष कसे संपले कळालेच नाही. अजून खूप काही करायचे आहे, असेही त्यांनी लिहिले. यावेळी अमिताभने अभिषेकसोबतचे काही फोटोही शेअर केले. त्याचबरोबर त्यांच्या या पोस्टला फॅन्सने केलेल्या ट्विटला रिट्विटही केले. या फोटोंमध्ये अभिषेकबरोबर मुलगी श्वेता बच्चन नंदा ही सुद्धा दिसत आहे. अभिषेक बच्चन याने २००० या वर्षी जेपी दत्ता यांच्या ‘रिफ्यूजी’ या सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक सिनेमे रिलिज झाले. मात्र या सिनेमांमधून तो फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. तब्बल अकरा सिनेमे फ्लॉप झाल्याने त्याच्या बॉलिवूड करिअरविषयी शंका उपस्थित केली गेली. मात्र ‘युवा’ या सिनेमातून त्याला खºया अर्थाने ब्रेक मिळाला. तो याच सिनेमामुळे लाइमलाइटमध्ये आला. त्यानंतर मात्र त्याला सक्सेस मिळत गेले. पुढे २००७ मध्ये त्याने ऐश्वर्याबरोबर विवाह केला. विवाहापूर्वी त्याचे नाव करिष्मा कपूर आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबरही जोडले गेले होते. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या नावाची मुलगी आहे. अभिषेक त्याच्या आगामी ‘हेरा फेरी-३’ मध्ये जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे.