Join us

बिप्स देतेय फिटनेस टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 11:01 IST

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या ‘बाली’ येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत. पुन्हा एकदा ते संपूर्ण जगातील अ‍ॅडव्हेंचर्स करायला ...

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या ‘बाली’ येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत. पुन्हा एकदा ते संपूर्ण जगातील अ‍ॅडव्हेंचर्स करायला निघाले आहेत. याअगोदरही त्यांनी मालदीव्हज, गोवा येथे एकमेकांसोबत वेळ घालवला आहे. काही ठिकाणी तर चक्क त्यांनी रोडट्रिप्सही केल्या आहेत.दोघांनाही ट्रॅव्हलिंग करायला प्रचंड आवडते. तसेच दोघेही फिटनेसच्या बाबतीत फारच कॉन्शियस आहेत. बिप्सने पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ती फिटनेस टिप्स देतांना दिसते आहे.तिने या फोटोंना कॅप्शन दिले आहे की,‘बाली ब्लिस फोअर सीजन जिम्बरान.’ बिप्सचा पती करणसिंग ग्रोव्हरही फोटोंमध्ये योगा करताना दिसतोय. एरिअल योगा म्हणजे करणचे स्पेशल आहे.