तेव्हा बिप्स घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:10 IST
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान हिने अलीकडेच एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला ‘बी टाऊन’ च्या इतर कलाकारांनी शुभेच्छा ...
तेव्हा बिप्स घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान हिने अलीकडेच एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला ‘बी टाऊन’ च्या इतर कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छा देणाऱ्यामध्ये ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ बिपाशा बासू देखील होती. करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न झाल्यानंतर ती केव्हा गुड न्यूज देते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले. बिप्स केव्हा गुड न्यूज देणार? असा प्रश्न तिला विचारण्यात आला असता ती म्हणते,‘ करिना कपूरप्रमाणे मलाही माझ्या चाहत्यांना गोड बातमी द्यायची आहे. पण, अद्याप ती योग्य वेळ आलेली नाही. मला आणि करणला भटकायला प्रचंड आवडतं. धम्माल, मस्ती करायला आवडतं. आम्ही अद्याप बाळाचा विचार देखील केलेला नाही. अजून २-३ वर्ष तरी मी तो करेल असे मला वाटत नाही. बाळ झाल्यानंतर आम्हाला आमचा वेळ असा काही उरणारच नाही. त्यामुळे एकमेकांसोबत आयुष्याचा यथेच्छ आनंद लुटतो आहोत. त्यानंतर ठरवू बाळाचं.’ ‘बी टाऊन’ मध्ये सैफीनाच्या अगोदर शाहिद कपूर आणि मीरा कपूर राजपूत हे एका बाळाचे जबाबदार पालक झाले. शाहिदने त्याच्या बाळाची एक झलकही चाहत्यांना दिसू दिली नाही. माध्यमांपासून तिला नेहमीच दूर ठेवले आहे. काळजी करणारा बाबा, कर्तव्यदक्ष वडिलाचे रूप त्याच्यामध्ये दिसते. आता आई होण्याचे वेध बिप्सलाही लागले आहेत. पण, तिला करणसोबत अजून थोडा वेळ घालवायचाय म्हणे. बरं ठीक आहे बिप्स. पण तरीही आम्ही वाट पाहतोय.