करणचे मित्र करताहेत बिपाशाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 10:05 IST
लग्नानंतर माणूस बदलतो, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे करणसिंग ग्रोव्हरच्या मित्रांना तो लग्नानंतर त्यांना पूर्वीप्रमाणे वेळ देणार नाही हे ...
करणचे मित्र करताहेत बिपाशाची तक्रार
लग्नानंतर माणूस बदलतो, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे करणसिंग ग्रोव्हरच्या मित्रांना तो लग्नानंतर त्यांना पूर्वीप्रमाणे वेळ देणार नाही हे अपेक्षित होते मात्र तो पत्नीच्या एवढ्या ‘ताब्यात’ जाईल याची त्यांनी नक्कीच कल्पना केली नसेल.म्हणून तर ते आता या हॉट कपलबद्दल नाराज आहेत, असे बोलले जातेय. करण जेथे जेथे करण जाईल तेथे बिपाशासोबत असतेच. म्हणजे मित्रांबरोबर तो बाहेर जरी गेला तरी बिप्सलासोबत घेऊन जातो. सुरूवातील मित्रांनासुद्धा हे सर्व योग्य वाटत होते. नवदाम्पत्य एकमेकांशिवाय राहू शकत नाही म्हटल्यावर तेदेखील खुश होते.परंतु आता हे त्यांना खटकू लागले. करणकडे बिपाशा व्यतिरिक्त कोणासाठी वेळच नसल्याचे ते तक्रार करत आहेत. लग्न झाल्यापासून करण-बिपाशा जणू अविभाज्य भागच बनले होते. प्रत्येक कार्यक्रमाला ते एकत्रच जातात. विकेंडला दोघेच कुठे तरी ‘मिनी व्हॅकेशनला’ जातात.करण आता पूर्वीसारखा राहिला नाही, असे त्यांच्या मित्रांचे म्हणने पडले. बिपाशाला त्याला ‘डॉमिनंट’ करतेय असेही त्यांना वाटतेय. म्हणून तर ते त्याच्याकडे बिपाशाची ‘कम्प्लेन’ करत आहेत. पण याचा करणवर काही परिणाम होताना दिसत नाही. पूर्वीच्या रिलेशनशिपपेक्षा तो बिपाशासोबत खूप आनंद आहे. त्यामुळे सध्या तरी त्याच्यासाठी बिपाशा म्हणजेच सर्व काही आहे. लव्हली कपल : करण आणि बिपाशामात्र, करण याचा अर्थ मित्रांना अशी वागणूक देणे बरोबर नाही. कारण त्यांनीच तुला दोन अपयशी लग्नांच्या गर्तेतून बाहेर येण्यास मदत केली आहे.