Join us

​बिप्सला महागात पडला योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 16:27 IST

बिपाशा बसू एका वादात सापडलीयं. होय, बेंगळुरु स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनमध्ये योग करणे बिपाशाला चांगलेच महागात पडले आहे. ...

बिपाशा बसू एका वादात सापडलीयं. होय, बेंगळुरु स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनमध्ये योग करणे बिपाशाला चांगलेच महागात पडले आहे. या इव्हेंटमध्ये लोकांना योगासाठी जागृत करण्यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप बिपाशावर करण्यात आला आहे. अर्थात बिपाशाच्या प्रवक्त्याने हा आरोप खारिज केला आहे. आरोग्य व  शारिरीक स्वास्थ्य याबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानेच बिपाशा या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती, असे बिपाशाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. यंदा श्र्वाासा ग्रूपचे वाचनानंद स्वामी यांनी कर्नाटक सरकारचे हेल्थ सेंटरसोबत मिळून या योगदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी या कार्यक्रमावर सुमारे ११ लाख रुपए खर्च होतात. यंदा या कार्यक्रमावर चौपट म्हणजे ४५ लाख रुपए खर्च झालेत. ४५ लाखांचे बिल राज्य सरकारच्या टेबलावर पोहोचल्यावर सगळ्यांच्याच भूवया उंवावल्या. सरकारले इतकी रक्कम देण्यास नकार तर दिलाच शिवाय श्र्वासा ग्रूपला याबाबत सगळा तपशील सादर करण्याचे निर्देशही दिले.