Join us

अव्यावसायिकतेचा आरोप बिपाशा बासूने फेटाळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 19:31 IST

अभिनेत्री बिपाशा बासू हिने फॅशन शो दरम्यान अव्यावसायिकतेचा आरोप फेटाळला आहे. एका महिलेने चुकीचा आरोप केला असून, माध्यमांनीही तिला प्रसिद्धी दिली याचे मला खूपच वाईट वाटले, असेही बिपाशाने म्हटले आहे.

अभिनेत्री बिपाशा बासू हिने फॅशन शो दरम्यान अव्यावसायिकतेचा आरोप फेटाळला आहे. एका महिलेने चुकीचा आरोप केला असून, माध्यमांनीही तिला प्रसिद्धी दिली याचे मला खूपच वाईट वाटले, असेही बिपाशाने म्हटले आहे.ट्विटरवर बिपाशाने ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. ‘माझ्या कामावर आक्षेप घेऊन एका महिलेने लुबाडल्याचा आरोप केला आणि त्याला माध्यमांनीही प्रसिद्धी दिली. अव्यासायिकतेच्या जोरावर तुम्ही १५ वर्षे काम करू शकत नाहीत. तुमची पारदर्शकता आणि स्वत:बद्दलचा आदर याच्या जिवावरच तुम्ही पुढे जाऊ शकता, असेही ती म्हणाली. बिपाशा बासू आणि तिचा पती करणसिंग ग्रोव्हर सध्या लंडनमध्ये असून, एका फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. रोनिता शर्मा रेखी या महिलेने म्हटले की शो चालू होण्यास केवळ चार तास बाकी असताना बिपाशाने हॉटेलच्या खोलीबाहेर येण्यास नकार दिला आणि काहीही बोलण्यास नकार दिला. जेंव्हा तिच्या मॅनेजरने बिपाशासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी तिने मॅनेजरला हाकलून दिले. त्याशिवाय त्याच्या तोंडावर दरवाजाही आपटला. पाच तासानंतर सना आणि रोनिता या वाट पाहत होत्या, त्यावेळी बिपाशा आणि करण आपल्या खोलीबाहेर आले आणि कोणाकडेही न पाहता लंडन शहरात निघून गेले.’ रेखी यांनी फेसबुकवरही ही पोस्ट टाकली आहे.