Join us

​मीडियावर भडकली बिपाशा बासू ! पोझ द्यायला दिला नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 10:58 IST

बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर दोघांना चाहत्यांसोबत स्वत:चे फोटो शेअर करायला आवडतात. दोघेही सोशल मीडियावर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह असतात. ...

बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर दोघांना चाहत्यांसोबत स्वत:चे फोटो शेअर करायला आवडतात. दोघेही सोशल मीडियावर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह असतात. इतकेच नाही तर दोघे  मीडियासोबतही सौजन्यानेच वागतात. मीडियासमोर पोज द्यायला, बिपाशा व करण दोघेही कधीही नकार देत नाहीत. स्वत:च्या लग्नातही त्यांनी मीडियाला समाविष्ट करून घेतले होते. पण यापुढे कदाचितच असे चित्र नसणार. होय, कारण काही आक्षेपार्ह कमेंट्समुळे बिपाशा इतकी नाराज झाली की, तिने मीडियाला तिचे फोटो घेण्यास व देण्यास नकार दिला आहे. आता बिपाशाच्या नाराजीमागचे कारण तर आपल्याला कळायलाच हवे.ALSO READ : लग्नानंतर बिपाशा बासूने साइन केला पहिला चित्रपटतर त्याचे झाले असे की, एका फोटोग्राफरने करण व बिपाशाचे जिममधील फोटो पोस्ट केलेत. या फोटोंसाठी बिपाशा व करण दोघांनाही सोशल मीडियावर बरेच ट्रोल व्हावे लागले. या फोटोंवरचे कमेंट्स अतिशय आक्षेपार्ह व अश्लिल होते. एका नेटिजन्सने तर थेट बिपाशा व करणच्या व्यक्तिगत आयुष्यावर कमेंट्स केले होते. ‘या दोघांनाही काहीच काम नसताना ते आपले बिल कसे चुकवत असतील? कदाचित त्यांचा एखादा बिझनेस असावा. यावर काही स्कूप आहे का?’ , असे कमेंट्स त्याने दिले होते. या व अशा कमेंट्सनी बिपाशा बसू चांगलीच नाराज झाल्याचे कळतेय. अर्थात या कमेंट्सवर सोशल मीडियावर बोलणे तिने टाळले. मात्र यानंतर एक मोठा निर्णय घेऊन मोकळी झाली. होय, हा निर्णय म्हणजे, यापुढे कधीही मीडियासोबत फोटो शेअर न करण्याचा.आता बिपाशाचा हा निर्णय योग्य की अयोग्य, यात आम्ही पडणार नाही. कदाचित सेलिब्रिटी असण्याची कधी कधी मोठी किंमत चुकवावी लागते. बिपाशाबाबतही कदाचित हेच घडले म्हणायचे.