Join us  

कोट्यवधीची मालकीण असलेली कॅटरिना कैफ राहते भाड्याच्या घरात, महिन्याला देते इतके भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 7:18 PM

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं. त्यामुळंच तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याच्या चर्चा सुरु होत्या.

बॉलीवूडची चिकनी चमेली म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ. घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि अभिनय यामुळे कतरिनानं अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नंबरची अभिनेत्री हे स्थान मिळवलं होतं. बराच काळ कतरिना नंबर वन पदावर होती आणि आजही तिची जादू कायम आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमा कतरिनाकडे आहेत. बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते.

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार कतरिनाकडे ६४ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय तिच्याकडे बड्या कंपन्यांच्या महागड्या आलिशान कार आहेत. मात्र आजही भारतात तिचं हक्काचं घर नाही. कतरिना आजही भाड्याच्या घरात राहते.

 

सुरुवातीच्या काळात कॅट वांद्रे इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होती. २०१४ साली ती त्यावेळचा बॉयफ्रेंडरणबीर कपूरसह कार्टर रोडच्या सिल्वर सेंड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. 

तरीही काही काळ कॅट त्याच घरात राहत होती. या घराचे सुमारे १५ लाख रुपये प्रति महिना भाडे होते. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना वांद्रे इथल्या माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली.

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं. त्यामुळंच तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याबाबत कॅटने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सध्या तरी कॅट मुंबईत भाड्याच्या घरातच राहते.

टॅग्स :कतरिना कैफ