Join us

​बाईकनं याड लावलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 15:10 IST

कृती सॅनॉनसोबतच्या अफेअरमुळं अभिनेता सुशांतसिंग राजपूत सध्या चर्चेत आहे.. मात्र सुशांतचं पहिलं प्रेम कृती नाही... आता तुम्ही म्हणाल की ...

कृती सॅनॉनसोबतच्या अफेअरमुळं अभिनेता सुशांतसिंग राजपूत सध्या चर्चेत आहे.. मात्र सुशांतचं पहिलं प्रेम कृती नाही... आता तुम्ही म्हणाल की त्याचं पहिलं प्रेम अंकिता लोखंडे होतं.. मात्र अंकितासुद्धा सुशांतचं पहिलं प्रेम नाही. त्याचं पहिलं प्रेम आहे बाईक. बाईक चालवणं सुशांतला भलतंच आवडतं. त्यानं त्याचं हे बाईकप्रेम वेळोवेळी उघड केलंय. याचीच प्रचिती करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीतही आली.बॉलीवुडचे सगळे तारे करणच्या पार्टीला कारमधून आले. इतकंच काय तर सुशांतची नवी लेडी लव्ह कृती सॅनॉन हिनंही कारमधूनच करणच्या पार्टीत एंट्री मारली. सुशांतनं मात्र आपल्या खास अंदाजात बाईकवरुन करणच्या पार्टीत धमाकेदार एंट्री केली. डोक्यावर हेल्मेट घालून रॉकिंग आणि रफ एंड टफ अंदाजात सुशांत या पार्टीत पोहचला. आता सुशांतची ही बाईक एंट्री बाईक प्रेमासाठी होती की कृतीच्या प्रेमासाठी हे मात्र न उलगडलेलं कोडं आहे. कारण कृतीसह एंट्री मारुन सुशांतला माध्यमांना गॉसिपची संधी द्यायची नसेल.