Join us  

सलमान खानच्या 'भारत'मध्ये झाला आता 'हा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 12:46 PM

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. या सिनेमातून प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती मात्र नंतर अशी माहिती मिळाली की प्रियांकाना या सिनेमातीन एक्झिट घेतली.

ठळक मुद्दे सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. या सिनेमातून प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती मात्र नंतर अशी माहिती मिळाली की प्रियांकाना या सिनेमातीन एक्झिट घेतली. त्यानंतर यात कॅटरिना कैफची एंट्री झाली. 

आता 'भारत'च्या स्टोरी लाइनला घेऊन चर्चा आहे. हा सिनेमा दक्षिण कोरिया 'ऑट टू माय फादर'वरुन प्रेरणा घेऊन तयार करण्यात येणार आहे. आता अशी चर्चा आहे की स्क्रिप्ट रायटर्सला कथेत बदल करण्यास सांगितला आहे.  यात सलमानच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याचकाळात त्याचे कॅटरिनाशी प्रेम होईल आणि नंतर लग्न. या चित्रपटात सलमान खानची वेगवेगळी रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळतील. म्हणजे तरूण ते वृद्ध अशा वेगवेगळ्या रूपात तो दिसेल. या सिनेमात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. नोरा फते एक विदेशी मुलीची भूमिका साकारणार आहे. ती भारतमध्ये माल्टामधल्या लॅटिन मुलीची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफ