Join us

बिग बींची मेडिकल टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 09:08 IST

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या ढासळलेली आहे. थोडासा वाटणारा आजार आता चांगलाच बळावलेला दिसतोय. नुकतेच त्यांच्यावर काही ...

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या ढासळलेली आहे. थोडासा वाटणारा आजार आता चांगलाच बळावलेला दिसतोय. नुकतेच त्यांच्यावर काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या आहेत.याची माहिती स्वत: बिग बींनी ट्विटरवरून चाहत्यांनी दिली. त्यांनी ट्विट केले की, चाहत्यांनो मी तुमची पुन्हा माफी मागतो. आज मला मेडिकल टेस्ट कराव्या लागल्या. त्यामुळे मला आराम करण्याची गरज आहे. पण लवकरच तुमच्याशी संवाद सुरू करेन.}}}}जानेवरीमध्ये रिलिज झालेल्या ‘वझीर’ सिनेमानंतर ते आता रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘तीन’ या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये विद्या बालन आणि  नवाझुद्दीन सिद्दीकी हेदेखील असणार आहेत.