अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून यात त्यांच्यासोबत तापसी पन्नूसह दोन अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे कथानक अतिशय संवेदनात्मक आहे.
समाजातील अनिष्ठ रूढी, प्रकारांना महिला कशाप्रकारे सामोरे जातात, याविषयी यात चित्रण करण्यात आले आहे. महिलांना त्यांच्या चारित्र्यावर एकही डाग न येऊ देता समाजात वावरण्यास किती अडचणी निर्माण होते, हे यात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे यात बिग बी अमिताभ बच्चन यांनी महिलांना समर्पित एक कविता तयार केली आहे.
जी कविता चित्रपट संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षकवर्ग जाऊ लागतो तेव्हा ही कविता दाखवण्यात येते. बिग बींचा आवाज या कवितेसाठी देण्यात आला आहे. या कवितेमुळे महिलांना त्यांचे सामर्थ्य आणि त्यांच्यातील आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मदत नक्कीच होईल.
https://www.youtube.com/watch?v=Sn9-bzUft_U