Join us

'बिग बी' सोबत करणार नवाजुद्यीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:25 IST

 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात चमकलेला गुणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'बिग बी' अमिताभ बच्चन सोबत झळकणार आहे. सुत्रांनी दिलेल्या ...

 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात चमकलेला गुणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'बिग बी' अमिताभ बच्चन सोबत झळकणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक सुजॉय घोष हे एका चित्रपटासाठी अमिताभ यांच्याकडे गेले असता अमिताभ यांना ती कथा आवडली. आणि खुद्द अमिताभ बच्चन यांनी या कथेतील एका पात्रासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला घेण्यात यावे, अशी शिफारस घोष यांच्याकडे केली.