Join us

​बिग बी आजारी, शूटींग लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:37 IST

बदलत्या हवामानामुळे बिग बी अमिताभ बच्चन आजारी पडल्याची बातमी आहे.  व्हायरल फीवरमुळे अमिताभ आजारी आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ...

बदलत्या हवामानामुळे बिग बी अमिताभ बच्चन आजारी पडल्याची बातमी आहे.  व्हायरल फीवरमुळे अमिताभ आजारी आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी शूटींगच्या तारखा लांबणीवर टाकल्या आहेत. अमिताभ यांच्याशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पूर्ण बरे वाटेपर्यंत अमिताभ विश्रांती करणार आहेत.  व्हायरल फीवर असल्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.  ‘आँखे २’चे लॉन्च आणि शूटींग शेड्यूलसंदर्भात अमिताभ मेकर्सची चर्चा करणार होते. मात्र आता हा प्रोजेक्ट लांबणीवर टाकण्यात आला आहे. आता या चित्रपटाची शूटींग जुलैमध्ये सुरु होणे अपेक्षित आहे.