Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिग बी, कंगनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 20:46 IST

आज मंगळवारी ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महानायक अमिताभ ...

आज मंगळवारी ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महानायक अमिताभ बच्चन यांना या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अख्खे बच्चन कुटुंब हजर होते. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक आणि स्रूषा ऐश्वर्या यांच्यासह मुलगी श्वेता नंदा ही सुद्धा या सोहळ्याला हजर होती. ‘पीकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी अमिताभ यांना ‘अग्निपथ’, ‘ब्लॅक’ व ‘पा’साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री कंगना रानोट हिला यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘तनु वेड्स मनू रिटर्न’मधील भूमिकेसाठी तिने हा पुरस्कार पटकावला.दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’साठी सर्वोत्कष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय तन्वी आझमी, विशाल भारद्वाज, कबीर खान, कल्की कोचलीन आदींनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.