बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन त्यांचा ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण, या वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत.
मुंबईपासून काहीच अंतरावर असलेलं अलिबाग हे सेलिब्रिटींचं वीकेंड डेस्टिनेशन आहे. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटी अलिबागमध्ये गुंतवणूक करत आहेत. काही सेलिब्रिटींनी याआधीही अलिबागमध्ये जमिनीत गुंतवणूक केली आहे. आता अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये तीन प्लॉट खरेदी केले आहेत. हे फ्लॅट ९५५७ चौ. फूट इतक्या परिसरात पसरलेले आहेत. यातील एक फ्लॅट २.७८ कोटींमध्ये खरेदी केला आहे. तर बाकी दोन फ्लॅटची किंमत ही २ कोटींच्या घरात आहे.
अलिबागमध्ये अमिताभ बच्चन यांची ही दुसरी प्रॉपर्टी आहे. तर एप्रिल २०२४मध्ये त्यांनी अयोध्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी केली होती. ज्याची किंमत सुमारे १० कोटींच्या घरात आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण प्रॉपर्टी ३५०० कोटींच्या घरात आहे.