Join us

दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:13 IST

अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत आरोप केले आहेत.

भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री वन्नू डी'ग्रेटची आता जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या पर्सनल आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत अभिनेता मनी मेराजवर आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणते की, ती मनी मेराजची पत्नी आहे, परंतु लग्नानंतर तिची फसवणूक झाली. तिचा नवरा तिला सोडून पळून गेला आहे.

वन्नू डी'ग्रेटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिच्यासोबत झालेला धक्कादायक प्रकार सांगितला. अभिनेत्रीने दावा केला आहे की, मनी मेराजने तिच्याशी लग्न केलं आहे. पण आता तो हे नातं स्वीकारण्यास नकार देत आहे. " मेराज, तू जिथे कुठेही असशील तिथून प्लीज परत ये. मला तुझ्या पालकांनाही हेच सांगायचं आहे की, आपण पती-पत्नी आहोत."

"तुझ्या आई-वडिलांनी सांगितलं होतं म्हणूनच मी ही गोष्ट लपवून ठेवली होती. लोक म्हणायचे की, तो खरा नाही. तो एक दिवस तुला सोडून जाईल. पण मी कोणाचंही ऐकलं नाही. तेव्हाही मी लोकांवर विश्वास ठेवला नाही" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या आरोपांवर मनी मेराज किंवा त्याच्या पालकांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कोण आहे मनी मिराज?

मनी मिराजने इन्स्टाग्राम रील्सने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच त्याने यूट्यूब व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता तो त्याच्या अभिनयाने आणि गाण्यांनी इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत आहे. एक काळ असा होता की तो चिकन विकून उदरनिर्वाह करत होता. पण भोजपुरी चित्रपटात पाऊल ठेवल्यानंतर त्याचं आयुष्य बदललं.

कोण आहे वन्नू?

वन्नू एक अभिनेत्री असली तरी ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ७५६ हजार फॉलोअर्स आहेत. वन्नू आणि मिराज यांच्यातील नात्याचं नेमकं सत्य काय आहे हे फक्त त्यांनाच माहिती आहे, परंतु अभिनेत्रीचा व्हिडीओ निश्चितच धक्कादायक आहे. ती ज्या पद्धतीने रडत आहे आणि तिच्या पतीला परत येण्याची विनंती करत आहे हे पाहून तिचे चाहते दु:खी झाले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्न