Join us

लहानपणी असा दिसायचा भाईजान सलमान, भावा-बहिणीसोबतचा बालपणीचा सल्लुमियाँनं फोटो सोशल मीडियावर केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 23:09 IST

दबंग अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक गोष्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा असते. सलमानची प्रत्येक गोष्ट त्याच्या फॅन्सना भावते. सलमानचा अभिनय, डान्स आणि ...

दबंग अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक गोष्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा असते. सलमानची प्रत्येक गोष्ट त्याच्या फॅन्सना भावते. सलमानचा अभिनय, डान्स आणि त्याच्या प्रत्येक हरकती रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. रुपेरी पडदा आणि छोटा पडदा दोन्ही माध्यमातून सलमाननं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांचं सलमानवरील प्रेम हे सर्वश्रुत आहेच. मात्र सलमानचं पहिलं प्रेम काय हेसुद्धा त्याच्या रसिकांना चांगलंच माहिती आहे. अभिनेता सलमान खानचं त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे. त्याचे हे प्रेम त्याने वेळोवेळी उघडपणे व्यक्तही केले आहे. मग ते प्रेम आपल्या पालकांबाबतचं असो, भावंडांबाबतचं किंवा मग भावाबहिणींच्या मुलांबाबत. सलमान खान वेळोवेळी आपल्या या लाडक्या कुटुंबावरचं प्रेम उघडपणे व्यक्त करत असतो. नुकताच सलमान खाननं आपल्या भावंडासोबतचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बालपणीच्या सलमान खानसह अरबाज खान, अलविरा खान आणि सोहेल खान पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना सलमाननं त्याला एक छानशी कॅप्शनही दिल्याचं पाहायला मिळत आहे. जस्ट ए फ्यू इअर्स अगो म्हणजेच अवघ्या काही वर्षांपूर्वी अशी पोस्टही त्याने टाकली आहे. बालपणीच्या या फोटोत खान बंधू आणि त्यांच्या भगिनी भलतेच क्यूट दिसत आहेत. स्वतः अविवाहित असूनही सलमान एक परफेक्ट फॅमिली मॅन असल्याचं या फोटोमुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे. सलमान खान सध्या छोट्या पडद्यावर 'बिग बॉस-11' या रियालिटी शोचा होस्ट बनून रसिकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय रुपेरी पडद्यावरही लवकरच पुन्हा एकदा भाईजानचा जलवा पाहायला मिळणार आहे. सलमानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 2012 साली रिलीज झालेल्या एक था टायगर या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमात ब-याच काळानंतर सलमान अभिनेत्री कॅटरिनासह झळकणार आहे. अली अब्बास जफर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. सलमानच्या या आगामी सिनेमाची रसिकांना आता उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या आपल्या भावंडासोबतच्या बालपणीच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे सलमान खान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.