Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 15:10 IST

संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू ...

संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तायारीत आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू याच्याबद्दल. सलमान खानसोबत ‘मैनें प्यार किया’मधून बॉलिवूड डेब्यू करणाºया भाग्यश्रीचा लाडका लेक अभिमन्यू लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. केवळ करणार नाही, तर त्याने एक चित्रपट सुद्धा साईन केलाय. वसन बालन यांच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिमन्यू दिसणार आहे. अ‍ॅक्शन -कॉमेडीची भरमार असलेला हा चित्रपट अनुराग कश्यपची निर्मिती आहे.रिपोर्ट्सचे मानाल तर, यात अभिमन्यूच्या अपोझिट दिसणार आहे, ती राधिका मदन. अभिमन्यू व राधिका या दोघांनी ब-याच दिवसांपासून चित्रपटाची तयारी सुरु केल्याचे कळतेय. कारण या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स आहेत. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून चुकला आहे. ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’मध्ये त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या तरी तो आपल्या डेब्यू चित्रपटात व्यस्त आहे. अभिमन्यूचे मानाल तर, तो त्याच्या डेब्यूसाठी प्रचंड उत्सूक आहे. सोबतच त्याच्यावर दबावही आहे. स्टारकिड्स असल्याने काहीही फायदा होत नाही. उलट याने तुमच्यावर अधिक प्रेशर निर्माण होते, असे त्याचे मत आहे. आता हे प्रेशर अभिमन्यू कसे आणि किती पेलतो, हे लवकरच कळेल. तूर्तास तरी अभिमन्यूच्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. लवकरच त्याच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहेत.