‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीचे आयकॉनिक पात्र साकारलेली सौम्या टंडन आता लवकरच मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ती आदित्य धरच्या 'धुरंधर' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग बनली आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सौम्याने एका मुलाखतीत तिच्या सिनेमातील भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल सांगितले.
झूमला दिलेल्या मुलाखतीत सौम्या टंडननेरणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याबद्दलही बरेच काही सांगितले. सौम्याने खुलासा केला की, हा चित्रपट निवडण्यामागचे कारण 'धुरंधर' आणि त्याचे निर्माता-दिग्दर्शक आदित्य धर हे स्वतः आहेत. ती म्हणाली की, "मला नेहमीच आदित्य धर यांच्यासोबत काम करायचे होते. म्हणूनच मी हा चित्रपट केला. ही भूमिका छोटी आहे, पण माझ्या करिअरमधील सर्वात तीव्र पात्रांपैकी एक आहे. प्रेक्षक मला नेहमीच चुलबुली आणि आनंदी भूमिकांमध्ये पाहत आले आहेत, त्यामुळे हा एक वेगळा अनुभव असेल."
अक्षय खन्ना आणि रणवीर सिंगबद्दल अभिनेत्री म्हणाली...सौम्या टंडनने सांगितले की, तिचे सर्व सीन एकतर अक्षय खन्ना किंवा रणवीर सिंग यांच्यासोबत आहेत. तिने मस्करीत म्हटले, "अक्षय खन्ना तर संपूर्ण सीन चोरतात. खरे सांगायचे तर, जेव्हा ते फ्रेममध्ये असतील तेव्हा कोणी माझ्याकडे बघेल की नाही या विचाराने मी घाबरलेली आहे." अभिनेत्रीने चित्रपटातील रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. ती म्हणाली की, "मला वाटते की, हा रणवीरच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनयापैकी एक आहे. तो या भूमिकेत शानदार आहे आणि त्याला जेवढे प्रेम मिळेल, तो त्यासाठी पूर्णपणे पात्र आहे."
'धुरंधर'बद्दल'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन हे मुख्य भूमिकेत आहेत. B62 स्टुडिओ आणि जिओ स्टुडिओज निर्मित हा चित्रपट मोठ्या स्तरावरील ॲक्शन-थ्रिलर आहे. यांच्या व्यतिरिक्त कीथ सिक्वेरा, राकेश बेदी आणि मानव गोहिल हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Web Summary : Saumya Tandon, famed from 'Bhabiji Ghar Par Hai,' joins Aditya Dhar's 'Dhurandhar,' a thriller releasing December 2025. She lauded the director and her role's intensity. Sharing scenes with Akshay Khanna and Ranveer Singh, she praised their performances, especially highlighting Ranveer's acting as career-best.
Web Summary : 'भाबीजी घर पर है' से मशहूर सौम्या टंडन आदित्य धर की 'धुरंधर' में शामिल, रोमांचक फिल्म दिसंबर 2025 में रिलीज होगी। उन्होंने निर्देशक और अपनी भूमिका की तीव्रता की सराहना की। अक्षय खन्ना और रणवीर सिंह के साथ दृश्य साझा करते हुए, उन्होंने उनके अभिनय की प्रशंसा की, खासकर रणवीर के अभिनय को सर्वश्रेष्ठ बताया।