Join us
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार ! आमिर खानची लेक इराचं नाव चुकीचं उच्चारलात तर बसेल ५ हजारांचा दंड, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 10:41 IST

आमिर खानची मुलगी इरा खानने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खानने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. इरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर एक मोठी फॅन फॉलोइंगदेखील आहे. मात्र इरा खान ही स्वतःच्या नावाचे योग्य उच्चारण करण्यात येत नसल्याने थोडी अस्वस्थ झाली आहे. यासाठी तिने चक्क सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

इराने शेअर केलेल्या व्हिडीओत  तिच्या नावाचा योग्य उच्चार कसा करायचा हे सांगितले आहे. तसेच जे लोक योग्य उच्चारण करणार नाहीत, त्यांना कडक इशारादेखील दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

इरा खानने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, माझे काही मित्र मला नावावरून चिडवत असतात. ते सर्वजण मला इरा अशी हाक मारतात. त्यामुळे मी माझे नाव योग्य पद्धतीने कसे उच्चारण करायचे हे सांगण्याचा निर्णय घेतला आहे. माझे नाव आयरा असे आहे. उदा. आई आणि रा. यानंतर जर कोणी मला इरा म्हणत असेल तर त्याला पाच हजार रुपये जमा करावे लागतील, जे मी महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी देणगी देईन. प्रत्येक जण मला इरा म्हणून बोलवतात. प्रेस, मीडिया आणि आपणा सर्वांसाठी माझे नाव आयरा असे आहे.

इराने व्हॅलेटाईन डेच्या दिवशी आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह प्रेमात असल्याचे जाहीर केले होते. अनेकदा ती नूपूरसोबत विविध अंदाजातील फोटो शेअर करते. इरा नूपूरची खूप काळजी घेते. बऱ्याचदा ते फोटोमुळे चर्चेत येतात.

टॅग्स :आमिर खानइरा खान