Join us

बेस्ट फ्रेंड दिव्या भारतीच्या पतीवर तब्बू झाली होती फिदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 18:44 IST

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे लव कनेक्शन जुळेल याचा काही नेम नसतो. प्रेम जुळण्यापासून ते ब्रेकअप होण्यापर्यंतचा सिलसिला सुरूच असतो. यातून ...

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे लव कनेक्शन जुळेल याचा काही नेम नसतो. प्रेम जुळण्यापासून ते ब्रेकअप होण्यापर्यंतचा सिलसिला सुरूच असतो. यातून अभिनेत्री तब्बूचीही सुटका झालेली नाही. सतीश कौशिक यांच्या ‘प्रेम’ या चित्रपटात अभिनेत्री तब्बू आणि संजय कपूर यांनी एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. तब्बू तर संजयवर फिदा झाली होती. मात्र याचदरम्यान, संजयच्या आयुष्यात अभिनेत्री रविना टंडन आली. त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. परंतु काही दिवसांनंतरच तब्बू पुन्हा एकदा प्रेमात पडली, मात्र यावेळेस तिचा जीव तिची बेस्ट फ्रेंड दिव्या भारतीच्या पतीवर जडला होता. ‘बॉलिवूड आजकल’ या यू-ट्यूब चॅनेलनुसार संजयच्या आयुष्यात रविना आल्यानंतर तब्बूने त्याच्यापासून दूर जाणे योग्य समजले. त्यांच्यातील नाते तुटले; मात्र काही दिवसांतच ती साजिद नाडियाडवाला याच्या प्रेमात पडली. वास्तविक साजिद तब्बूची बेस्ट फ्रेंड दिव्या भारती हिचा पती होता. दिव्या आणि तब्बूमध्ये खूपच चांगली मैत्री होती. जेव्हा केव्हा ती दिव्याला भेटायला जायची तेव्हा ती साजिदची आवर्जुन भेट घ्यायची. याचदरम्यान दिव्याचे निधन झाले. पुढे साजिदला तब्बूचा इमोशनली आधार मिळाला. यादरम्यान दोघांमध्ये जवळिकताही वाढली. असे म्हटले जाते की, दिव्याला साजिद आणि तब्बूमधील अफेअरची कल्पना होती. मात्र याविषयी ती कधीच सिरियस नव्हती. आता तर साजिद एकटा पडला होता, शिवाय तब्बूही एकाकी जीवन जगत होती. अशात साजिदने तब्बूला लग्नाची मागणी घातल्याचेही बोलले जाते. मात्र तब्बूने साजिदच्या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. पुढे काही काळानंतर तब्बूच्या आयुष्यात साउथ सुपरस्टार नागार्जुनची एंट्री झाली. जेव्हा ही बाब साजिदला कळाली तेव्हा त्याने तब्बूपासून दूर जाणे पसंत केले. पुढे त्यांच्यातील नाते पूर्णपणे संपले. तर तब्बू आणि नागार्जुन यांच्यात जवळिकता निर्माण झाली. असे म्हटले जाते की, हे दोघे तब्बल दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तब्बूसाठी नागार्जुनने हैदराबाद येथे एक घरही खरेदी केले होते. परंतु पुढे त्यांचे नाते टिकू शकले नाही.