१४ फेब्रुवारी १९९९ मध्ये चित्रपट निर्माता राज कौशल याच्याशी लग्न करणाºया मंदिराला सहा वर्षांचा वीर नावाचा एक मुलगा आहे. ज्याचा जन्म १९ जून २०११ रोजी झाला आहे. ४५ वर्षीय मंदिरा आपले प्रोफेशन आणि फिटनेसविषयी प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही ती फिट दिसते. खरं तर त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते. नियमित वर्कआउट आणि फिटनेस डेडिकेशनमुळेच तिला हा लूक मिळाला होता.
मंदिराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जर नजर टाकली तर बºयाचशा फोटोंमध्ये ती वर्कआउट करताना बघावयास मिळते. एका मुलाखतीत मंदिराने सांगितले होते की, माझ्या झीरो फिटनेसचे रहस्य दररोज दहा किलोमीटर धावणे होय. यावेळी तिने हेदेखील म्हटले होते की, मी ज्या ठिकाणी जाते त्याठिकाणी स्पोटर्स शूज सोबत घेऊन जात असते. कारण रनिंग केल्याशिवाय माझा दिवस जात नसल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान, मंदिराच्या या अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी तिच्या फोटोला पसंती दिली तर काहींनी त्यावर सडकून टीकाही केली.