एकता कपूरने ट्वीट करताना लिहिले, 1 जून मोठा दिवस आहे. कारण लक्ष्यच्या बर्थ डेच्या दिवशी वीरे दी वेडींग चित्रपट रिलीज होणार आहे. बर्थ डे आणि लग्नाचे आमंत्रण तुम्हाला सगळ्यांना आहे.1 June is one big day!!!! Veere di wedding arrives on my lakkshya ‘s bday!!!! Ab shaadi aur bday pe aap sab ko nimantran hai— Ekta Kapoor (@ektaravikapoor) January 12, 2018
ALSO READ : करिना कपूर-खानच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर धूम!!
वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात करिनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे.