Join us

'या' कारणांमुळे करिना कपूरच्या फॅन्सना तिला पडद्यावर बघण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 10:46 IST

वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दोन पोस्टर आता पर्यंत रिलीज करण्यात आले हे दोन्ही पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. करिना ...

वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दोन पोस्टर आता पर्यंत रिलीज करण्यात आले हे दोन्ही पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. करिना कपूरचे फॅन्स तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक होते. शेवटची करिना उडता पंजाब चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तैमूरच्या जन्मासाठी तिने काहीकाळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ती कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. अनेक वेळा वीरे दी वेडिंगच्या शूटिंग दरम्यान करिना तैमूरला सेटवर घेऊन जायची. तैमूरचे आई सोबत जातानाचे अनेक फोटो एअरपोर्टवर टिपले आहे.  करिनाला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी काही काळ तिच्या फॅन्सना वाट बघावी लागणार आहे. कारण तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात आधी हा चित्रपट 18 मे रोजी रिलीज होणार होता. मात्र आता चित्रपटाच 1 जूनला रिलीज होणार आहे. ही माहिती चित्रपटाची निर्मिती एकता कपूर हिने ट्वीटर वरुन दिली.    एकता कपूरने ट्वीट करताना लिहिले, 1 जून मोठा दिवस आहे. कारण लक्ष्यच्या बर्थ डेच्या  दिवशी वीरे दी वेडींग चित्रपट रिलीज होणार आहे.  बर्थ डे आणि लग्नाचे आमंत्रण तुम्हाला सगळ्यांना आहे.  ALSO READ :  करिना कपूर-खानच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर धूम!!वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात करिनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे.