मुंबईत घर नसल्याने शाहरूख खानला पत्नी गौरीसोबत सेटवरच काढावी लागली लग्नाची पहिली रात्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 17:53 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याला इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले हे कदाचित सगळ्यांनाच माहिती आहे. ...
मुंबईत घर नसल्याने शाहरूख खानला पत्नी गौरीसोबत सेटवरच काढावी लागली लग्नाची पहिली रात्र!
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याला इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले हे कदाचित सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा शाहरूख इंडस्ट्रीत धडपड करीत होता, तेव्हा एक व्यक्ती अशी होती, जिला पूर्ण खात्री होती की, शाहरूख एक दिवस बॉलिवूडचा बादशाह होईल. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून, शाहरूखची पत्नी गौरी खान होती. शाहरूख गौरीवर किती प्रेम करायचा याचा अंदाज आपल्याला त्यांची लव्हस्टोरी वाचल्यानंतरच होईल. जर शाहरूख आणि गौरीचा एखादा लव्हस्टोरी बेस्ड चित्रपट काढला तर तो प्रेक्षकांना भावेल यात तिळमात्रही शंका नाही. कारण लव्हस्टोरी ही सहजसोपी नसून, अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. त्याचाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शाहरूखला आज बॉलिवूडचा किंग म्हटले जाते. मात्र ही उपाधी तिला एवढ्या सहजासहजी मिळाली नाही. होय, एक काळ असाही होता, जेव्हा शाहरूख दिवसभर दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घराच्या पायºया झिजवाव्या लागत असत. शाहरूखने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या लव्ह लाइफ संबंधित काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यामुळे शाहरूखच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे की, गौरीशी लग्न करण्यासाठी शाहरूखला किती धडपड करावी लागली. मात्र ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे की, लग्नाची पहिली रात्र या दोन लव्ह बर्डनी कशी घालविली. शाहरूखने काही दिवसांपूर्वीच याविषयीचा एक किस्सा शेअर केला. शाहरूखने त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा किस्सा सांगून सगळ्यांनाच धक्का दिला. त्याने म्हटले की, ‘तसं बघितलं तर लग्नाची पहिली रात्र खूपच स्पेशल असते. फुलांनी सजलेल्या एका रूममधून ते दाम्पत्य त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करीत असतात. परंतु माझ्या बाबतीत असे अजिबातच झाले नाही.’ वास्तविक, ज्या दिवशी शाहरूखने गौरीसोबत लग्न केले त्याचदिवशी हे दोघे मुंबईत आले. शाहरूखला त्याच्या जीवनाची नवी सुरुवात मुंबई येथून करायची होती. मात्र जेव्हा तो पत्नी गौरीला घेऊन मुंबईत आला, तेव्हा त्याच्याकडे राहण्यासाठी निश्चित अशी जागा नव्हती. त्यामुळे त्याला पत्नी गौरीसोबत लग्नाची पहिलीच रात्र चित्रपटाच्या सेटवरच काढावी लागली. शाहरूखने हा किस्सा सांगताना म्हटले की, ‘मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, मी इंडस्ट्रीत सुपरस्टार होईल. मात्र माझी पत्नी गौरीला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती क्षणोक्षणी माझ्यासोबत होती. चांगल्या-वाईट काळात तिने माझी साथ दिली. त्यामुळेच आज मी निश्चित यश गाठू शकलो.’