Join us

बेबो चिल्स इन मस्काट विथ गर्लगँग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 10:37 IST

उन्हाळा सुरू असल्याने सर्वच जण थंड ठिकाणी जाऊन मस्तपैकी गर्मीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेल, यामध्ये  सेलिब्रिटीही मागे ...

उन्हाळा सुरू असल्याने सर्वच जण थंड ठिकाणी जाऊन मस्तपैकी गर्मीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेल, यामध्ये  सेलिब्रिटीही मागे नाहीत. करिना कपूर खान म्हणजेच बेबो नुकतीच मस्काटला तिच्या गर्लगँगसोबत गेली आहे.करिना एकटी जरी कुठे गेली तरी तेथील वातावरण हॉट होते यात काही कुणाला शंका वाटते का? वेल, नाही ना. ती सध्या एका ब्रँड इव्हेंटसाठी मस्काट येथे गेली असून पूलसाईडला ती तिच्या गर्लगँगसोबत मस्त थंड वातावरणाचा आनंद घेत आहे.तिला हे चांगलेच माहिती आहे की, स्विमिंग ड्रेसिंगमध्ये हॉट कसे दिसावे ते! आता तिला असं पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटतेय ना की, आपणही बॅग पॅक करावी आणि थेट निघावं एखाद्या हिलस्टेशनला!