Join us

सेम टू सेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 17:41 IST

सैफ अली खानने त्याचा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सैफने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला ...

सैफ अली खानने त्याचा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सैफने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला एक पांढऱ्या रंगाचे सुंदर जॅकिट घातले होते. पण हे जॅकिट पाहिल्यावर आमिर खानने काही दिवसांपूर्वीच घातलेल्या जॅकिटची आठवण आली. कारण आमिर खानने अशाचप्रकारचे पांढरे जॅकिट नुकतेच पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला घातले होते. केवळ या जॅकिटची बटणे ही पांढरी होती तर सैफने घातलेल्या जॅकिटची बटणे ही सोनेरी रंगाची होती. आमिर आणि सैफला या कपड्यात बाजूबाजूला उभे केले तर त्या दोघांचे कपडे खूपच सेम टू सेम दिसतील.