Join us

​‘बॉलिवूडची बर्फी’ क्रिती सॅनन अडकली बहिणींच्या भांडणात! चालवणार ‘छुरियां’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:52 IST

केवळ तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिची चर्चा केवळ तिच्या सौंदर्यासाठीच होते, असे ...

केवळ तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिची चर्चा केवळ तिच्या सौंदर्यासाठीच होते, असे नाही. तर तिच्या चित्रपटांमुळेही ती चर्चेत असते. यात ‘बरेली की बर्फी’ या तिच्या चित्रपटाचे मोठे श्रेय आहे. या चित्रपटात क्रितीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आणि क्रिती सगळ्यांसाठी बर्फीसाररखी गोड बनली. पण आता हीच बर्फीसारखी गोड क्रिती ‘छुरियां’ चालवताना दिसणार आहे. होय, आम्ही बोलतोय, ते क्रितीच्या नव्या चित्रपटाबद्दल. खबर खरी मानाल तर क्रितीने दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा चित्रपट साईन केला आहे. यात क्रिती लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाचे नाव ‘छुरियां’ असल्याचे कळतेय.‘छुरियां’ हा चित्रपट दोन बहिणींच्या संघर्षाची कथा आहे. या दोघींमध्ये केवळ रोज भांडणंचं होत नाहीत तर एकमेकांविरोधात हत्यार उपसण्यापर्यंत त्यांचा वाद विकोपाला जातो, अशी ही कथा आहे. या चित्रपटात क्रिती दोन बहिणींपैकी लहान बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मोठ्या बहिणीची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्तास या शर्यतीत श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, भूमी पेडणेकर, परिणीती चोप्रा आदी अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. ‘बेफिक्रे गर्ल’ वाणी कपूर हिच्या नावाचीही चर्चा आहे. आता यापैकी कुठली अभिनेत्री क्रितीची मोठी बहिण बनते, ते बघूच.ALSO READ :  casting couchबद्दल क्रिती सॅननने केला मोठा खुलासा!‘छुरियां’ हा चित्रपट राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचेही समजते. स्टारकास्ट निश्चित झाल्यानंतर येत्या नव्या वर्षांत या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. क्रितीने टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटामधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर शाहरूख खान व वरूण धवनसोबत ‘दिलवाले’ या चित्रपटात ती दिसली. यापाठोपाठ सुशांत सिंग राजपूतसोबत ‘राबता’ही तिने केला. ‘राबता’ फ्लॉप राहिला. पण याच चित्रपटाच्या सेटवर सुशांत व क्रिती यांचे सूत जुळल्याचे बोलले जाते. दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहेत, असे कळते. अर्थात क्रिती व सुशांत दोघांनीही आपले रिलेशनशिप अद्याप मान्य केलेले नाही.