Join us

बराक ओबामांच्या लिस्टमध्ये छाया कदम यांचा सिनेमा नंबर १, बघा टॉप १० सिनेमांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:30 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी त्यांच्या टॉप १० सिनेमांची यादी सांगितली. यामध्ये छाया कदम यांचा सिनेमा नंबर १ वर आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे असंख्य चाहते आहेत. बराक ओबामांची जीवनशैली आणि त्यांंचं व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ओबामा मनोरंजन विश्वातील कलाकृतींनाही त्यांची दाद देत असतात. अशातच ओबामांनी सोशल मीडियावर त्यांच्या टॉप १० सिनेमाची यादी पोस्ट केली. यामध्ये भारतासाठी आणि विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांचा एक सिनेमा ओबामांच्या टॉप १० लिस्टमध्ये नंबर १ वर आहे.

छाया कदम यांचा हा सिनेमा ओबामांचा फेव्हरेट

बराक ओबामांनी नुकतीच सोशल मीडियावर त्यांच्या टॉप १० सिनेमांची यादी पोस्ट केली. या यादीत मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांची भूमिका असलेला All We Imagine As Light हा सिनेमा नंबर १ वर आहे. त्यामुळे सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. All We Imagine As Light हा सिनेमा यावर्षी कान्सपासून जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये गाजला. त्यामुळे ओबामांनी निश्चितच हा सिनेमा बघितला असून त्यांच्या फेव्हरेट सिनेमांमध्ये हा सिनेमा नंबर १  वर गेलाय.

हे आहेत ओबामांचे टॉप १० सिनेमे

  1. ALL WE IMAGINE AS LIGHT (ऑल वी इमॅजिन अॅस लाइट)
  2. CONCLAVE (कॉनक्लेव्ह)
  3. THE PIANO LESSON (द पिआनो लेसन)
  4. THE PROMISED LAND (द प्रॉमिस लँड)
  5. THE SEED OF THE SACRED FIG (द सीड ऑफ द सेक्रेड फिग)
  6. DUNE: PART TWO (ड्यून पार्ट २)
  7. ANORA (अनोरा)
  8. DIDI(弟弟) (दीदी)
  9. SUGARCANE (शुगरकेन)
  10. A COMPLETE UNKNOWN (अ कम्प्लीट अननोन)
टॅग्स :बॉलिवूडमराठीमराठी अभिनेता