Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीला एअरपोर्टवरुन अटक, विद्यार्थ्याच्या हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:53 IST

नुसरतला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २०२४ मधील एका प्रकरणात नुसरत विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. रविवारी(१८ मे) थायलंडला जात असताना नुसरतला ढाका एअरपोर्टवर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

सिनेविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाका येथील शाहजलाल इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन अटक करण्यात आली आहे. नुसरतला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २०२४ मधील एका प्रकरणात नुसरत विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. रविवारी(१८ मे) थायलंडला जात असताना नुसरतला ढाका एअरपोर्टवर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

२०२४ मध्ये सरकारच्या विरोधात प्रदर्शनादरम्यान एक घटना घडली होती. यात १७ लोकांची नावं समोर आली होती. त्यात फारियाचंही नाव आहे. यामध्ये काही विद्यार्थीही सहभागी झाली होते. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण प्राप्त झालं होतं. यातील एका विद्यार्थ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली नुसरतला अटक करण्यात आली आहे. 

नुसरत फारिया २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मुजीब द मेकिंग ऑफ ए नेशन या सिनेमात पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांची भूमिका साकारून नुसरत प्रसिद्धीझोतात आली होती. तिच्या या भूमिकेला पसंती मिळाली होती. श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेत्री असण्यासोबतच नुसरत एक रेडियो जॉकीदेखील आहे. आशिकी : ट्रू लव या सिनेमातून तिने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. बादशाह- द डॉन, हीरो 420, प्रेमी ओ प्रेमी और बॉस 2: बैक टू रूल या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटी