Join us

​ बानीसोबतच्या किसींग सीनवर सपना भवनानी म्हणाली; माझे आयुष्य, माझे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 15:02 IST

सपना भवनानी आणि व्हिजे बानी जे या दोघींना मुंबईच्या बिचवर एकमेकींना किस करताना आपण बघितलं. या किसींग सीनचा व्हिडिओ, ...

सपना भवनानी आणि व्हिजे बानी जे या दोघींना मुंबईच्या बिचवर एकमेकींना किस करताना आपण बघितलं. या किसींग सीनचा व्हिडिओ, फोटो व्हायरल झालेत आणि सगळीकडे खळबळ माजली. लगेच या फोटोंबद्दल सपनाला विचारण्यात आले. यावर मी आत्ता एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये आहे. सध्या यावर बोलू शकत नाही, असे सांगून तिने वेळ मारून नेली. पण तिच्या त्या वाक्याने या फोटोने वाढवलेली ‘गर्मी’ कमी होणार नव्हतीच. या फोटोंवर सपनाची प्रतिक्रिया ऐकण्यात सगळ्यांना रस होता. कारण मी बायसेक्युअल आहे, हे सपनाने आधीच जाहिर केले होते. त्यानुसार, प्रतिक्रियेसाठी तिचे फोन सारखे खणखणू लागले. इतके की, सपना चांगलीच वैतागली. मग काय, तिने सोशल मिडियावर खुलासा करणेच योग्य समजले. तिने लिहिलेय, आत्ताच योगा संपवला आणि माझा व बानीचा एक किसींग सीन व्हायरल होत असल्याचे पाहिले. काश,हा किसींगसीन असता. पण हा केवळ snapshot of a boomerang होता. इंडिया, आपण कधी पुढे जाणार आहोत? एका ‘किस’वर इतकी चर्चा? लोक जगात शांती नांदावी, यासाठी काय काय करताहेत. ते सोशल मीडियावर इतक्या वेगाने ट्रेंड होत नाहीत. आशा करते की, अधिकाधिक महिला व पुरूष समोर येतील व एकमेकांना किस करतील आणि प्रेम हे लिंग बघून केले जात नाही, हे जगाला दाखवून देतील. माझे आयुष्य, माझेच नियम. महिला, पुरूष आणि ट्रान्सजेंडर सगळ्यांना माझ्याकडून ‘किस’.ALSO READ : OMG!! मुंबईच्या बिचवर किस करताना दिसल्या व्हीजे बानी व सपना भवनानी!एकंदर काय, तर बानी व तिच्या एका किसींग सीनच्या फोटोमुळे सपना जराही विचलित झालेली नाही. याऊलट माझे आयुष्य मला ज्या पद्धतीने जगायचे, तसेच मी जगेल, हेच तिने लोकांना स्पष्टपणे सांगितले.