Join us  

हो, आम्हाला शांती हवी, ‘लक्ष्मी बॉम्ब’ नकोच...! अक्षय कुमारचा सिनेमा बॅन करण्याची मागणी

By रूपाली मुधोळकर | Published: October 05, 2020 4:19 PM

‘तो’ व्हिडीओ शेअर करणे पडले भारी; आता बहिष्काराची मागणी

ठळक मुद्देलक्ष्मी बॉम्ब हा अक्षयचा सिनेमा येत्या 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर स्टारकिड्स नेटक-यांच्या निशाण्यावर आले. त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही झाली. आता मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यालाही नेटक-यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. त्याच्याही सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. कारण काय तर त्याचा अलीकडे शेअर केलेला एक व्हिडीओ. होय, या व्हिडीओमुळे बिथरलेल्या नेटक-यांनी आता अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तूर्तास #BanLaxmiBomb हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.

आता या व्हिडीओची काय भानगड, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कालपरवाच बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदा बॉलिवूड   ड्रग्ज प्रकरण आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणावर बोलला होता. आता हीच प्रतिक्रिया अक्कीला महागात पडली आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्जची समस्या नाहीच, असा दावा मी करणार नाही. समस्या आहे. पण म्हणून सगळेच यात सामील असतील, असा याचा अर्थ नाही, असे अक्षय या व्हिडीओत म्हणाला होता. त्याच्या या व्हिडीओला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी पाठींबा दिला होता. यात करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, अंगद बेदी अशा अनेकांचा समावेश होता. नेटक-यांनी मात्र याच व्हिडीओवरून अक्कीच्या सिनेमाला विरोध करत त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

  लक्ष्मी बॉम्ब हा अक्षयचा सिनेमा येत्या 9 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉट स्टारवर  हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार   या चित्रपटात ट्रान्स जेंडरची भूमिका साकारत आहे. 

काय म्हणाला अक्षय...

अक्षय कुमारने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता.  यात तो म्हणतो, ‘आज काहीशा जड मनाने तुमच्यासोबत बोलतोय. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक गोष्टी मनात होत्या. पण आजुबाजूला इतकी निगेटीव्हीटी आहे की, कसे बोलू, कोणाला बोलू याचा विचार करत होतो. आम्ही म्हणायला स्टार्स आहोत. पण बॉलिवूड हे केवळ तुमच्या प्रेमामुळे उभे आहे.   जनतेच्या भावना आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मग तो अँग्रीमॅनचा आक्रोश असो, भ्रष्टाचार, गरिबी किंवा मग बेरोजगारी. प्रत्येक मुद्दा आम्ही चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक मुद्दे समोर आलेत. या घटनेने आम्हाला तुमच्याइतकेच दु:ख झाले. या पाठोपाठ आलेल्या मुद्यांनी आम्हाला चिंतन करण्यासाठी प्रवृत्त केले. आमच्या इंडस्ट्रीतील अनेक त्रूटी समोर आाल्यात. सध्याचा ड्रग्जचा मुद्दा यापैकी एक़ इंडस्ट्रीत ड्रग्जची समस्या नाहीत, असे मी तु्हाला खोटे सांगणार नाही. इंडस्ट्रीत ही समस्या आहे. ज्याप्रकारे अन्य इंडस्ट्रीत आहे, त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्येही आहे. पण म्हणून बॉलिवूडमधील प्रत्येक व्यक्ती यात गुंतला आहे, असे समजणे चुकीचे आहे. मी फक्त ऐवढेच म्हणेल की, सर्वांना एकाच नजरेतून बघू नका. हे चूक आहे, गैर आहे. मीडियावर माझा विश्वास आहे. पण मुद्दा उचलताना थोडी संवेदनशीलता बाळगा. कारण तुमची एक निगेटीव्ह न्यूज एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षांपासून कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकते. त्या व्यक्तिला उद्धवस्त करू शकते. शेवटी एकच म्हणेल की, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तेव्हा अशीच सोबत द्या. आम्ही चांगले काम करू, इतकाच विश्वास आम्ही देऊ शकतो.’

डायरेक्ट दिल से...! अक्षय कुमार बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनबद्दल बोलला, वाचा काय म्हणाला..

Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

टॅग्स :लक्ष्मी बॉम्बअक्षय कुमार