Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:25 IST

तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा झाले नाही तरच नवल. प्रत्येक क्षणाचा आनंद देणे ही मेहरची खासियत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना सारेच ओळखतात. त्यांचे सिनेमा, त्यांची भूमिका प्रत्येक फॅनला माहिती असते. आता बॉलीवूडचा दबंग खान सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा सा-यांनाच भावला. हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता. असं असलं तरी इतर कलाकारही तितकेच महत्त्वाचे होते. त्यांची भूमिका छोटीशी असली तरी ती विशेष होती. या सिनेमात मुन्नीसह तिची अम्मीही होती. मुन्नीच्या या अम्मीची सा-यांनीच रुपेरी पडद्यावर झलक पाहिली आहे.

प्रत्यक्षात मात्र ही अम्मी रिल दुनियेपेक्षा कितीतरी वेगळी आहे. मुन्नीच्या अम्मीची भूमिका साकारणा-या या अभिनेत्रीचं नाव मेहर विज असं आहे. सध्या मेहर विजच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.त्याला कारणीभूत ठरले आहे तिचे हे वर्कआऊटचे फोटो. मुळात मेहर ही फिटनेस फ्रिक आहे.

 मेहरने आजवर सिनेमात ब-याच छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. 'नो टाईम फॉर लव', 'दिल विल प्यार व्यार' अशा सिनेमात तिने सहकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरही मेहरने भूमिका साकारल्या आहेत. 'राम मिलायें जोडी', 'किस देश में है मेरा दिल' अशा मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.

छोट्या छोट्या मात्र लक्षवेधी भूमिका साकारणारी मेहर रिअल लाइफमध्ये भलतीच ग्लॅमरस आहे. तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा झाले नाही तरच नवल. प्रत्येक क्षणाचा आनंद देणे ही मेहरची खासियत आहे. याशिवाय मजामस्करी करणंही तिला तितकंच भावतं. तिचा हाच स्वभाव तिच्या फोटोंमध्येही पाहायला मिळतो.  

टॅग्स :सलमान खान