Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाहुबली’ प्रभासला साकारायची होती ‘भल्लालदेव’ची भूमिका, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:13 IST

‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी इतिहास निर्माण केला आहे. या चित्रपटातील जवळपास सर्वच पात्र सुपरहिट राहिले आहेत. मात्र यातील ...

‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी इतिहास निर्माण केला आहे. या चित्रपटातील जवळपास सर्वच पात्र सुपरहिट राहिले आहेत. मात्र यातील प्रेक्षकांच्या मनावर एक नाव कायमस्वरूपी कोरले गेले, ते म्हणजे बाहुबली अमरेन्द्र आणि बाहुबली महेंद्र! हे दोन्ही पात्र अभिनेता प्रभास याने साकारले आहेत.  त्यामुळे प्रभासला त्या सुपरस्टार्समध्ये स्थान मिळाले आहे, ज्या सुपरस्टार्सची लोकप्रियता अगणित आहे. असो, आज आम्ही प्रभासविषयी एक अशी बातमी सांगणार आहोत, ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. होय, प्रभासला राणा दगुबत्ती याने साकारलेली ‘भल्लालदेव’ची भूमिका साकारायची होती. प्रभासनेच याबाबतचा उलगडा केला आहे. प्रभासने म्हटले की, ‘बाहुबली ही माझी सर्वांत फेव्हरेट भूमिका होती. परंतु पर्याय म्हणून विचारल्यास मला भल्लादेवची भूमिका साकारायची होती. वास्तविका राणा दगुबत्ती यानेदेखील अतिशय खुबीने या भूमिकेला न्याय दिला आहे. भल्लालदेव हे पात्र त्याने अतिशय दिमाखदारपणे साकारल्याने बाहुबलीप्रमाणेच भल्लालदेवलाही तेवढीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे. प्रभासच्या मते, शूटिंगदरम्यान माझी राणासोबत खूपच चांगली मैत्री झाली होती. शूटिंगनंतर आम्ही असे काही वावरायचो की, कोणाचाही समज होईल की, या दोघांना पडद्यावर एकमेकांसोबत हाणामारी करणे शक्य होणार नाही. असो, या चित्रपटाने इतिहास रचला असून, प्रभास आणि राणा या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रभासच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, सध्या तो ‘साहो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद येथे होत आहे. चित्रपटात प्रभास डबलरोलमध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटाची कथा स्वातंत्र्याअगोदरची आहे. चित्रपटात त्याची अभिनेत्री अनुष्का शेट्टी नसून, श्रद्धा कपूर आहे. अनुष्काला तिच्या वाढत्या वजनामुळे चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.