बहुप्रतीक्षित चित्रपट बाहुबली-2 चा नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. हा पोस्टर आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरपेक्षा सगळ्यात वेगळा आहे. पहिल्यांदा या पोस्टरमध्ये अभिनेत्री दिसली आहे. आधीच्या पोस्टर्समध्ये राणा डग्गुबती आणि प्रभासला आपण भारी भक्कम गदा घेऊन पाहिले होते. आज गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचे 4 पोस्टर रिलीज करण्यात आले. नव्या पोस्टरमध्ये प्रभास आणि अनुष्का शेट्टी हातात धनुष्य पकडून उभे आहेत. यावरुन असे दिसते की प्रभास अनुष्काला धनुष्या बाण चालवायला शिकवतो आहे. हे पोस्टर राजमौलीने त्याच्या ट्वीटरवर आधी ट्वीट केले ज्याला एका तासात 4 हजार लोकांनी लाईक करत रिट्वीट केले. याच बरोबर राजमौलीने हे दृ्ष्य चित्रपटातील सुंदर दृष्यांपैकी एक असल्याचे लिहिले आहे. बाहुबली 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर गतवर्षी 22 ऑक्टोबरला लाँच करण्यात आले होते. या पोस्टरला 18व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल आणि चित्रपटातला मुख्य अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाच्या एक दिवसआधी लाँच केले गेले होते.
बाहुबली प्रमाणे बाहुबली2 मध्ये सुद्धा प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया आणि राणा डग्गुबती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 28 एप्रिल 2017 ला अखेर प्रेक्षकांना कळेल की बाहुबलीने कटप्पाला का मारले होते. कारण 28 एप्रिलाला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.
या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.दिवसंदिवस या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता वा़ढत आहे. त्यामुळे लवकरच या गोष्टीवरुन पडदा उठणार आहे 'के आखिर कटप्पाने बाहुली को क्यूँ मारा ?'
’