Join us

​बद्रिनाथ की दुल्हनीयाचे ‘आशिक सरेंडर हुवा’ गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 17:46 IST

म्युुझिक काऊंटडाऊनमध्ये हिट ठरले असून सध्या या गाण्याची सर्वाधिक स्ट्रिमिंग केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. ‘तम्मा तम्मा अगेन’ या धमाकेदार डान्स नंबर म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये नंबर वन ठरला आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’मधील सुपर हॉट जोडीचा जबरदस्त डान्स परफार्मन्स असलेले ‘आशिक सरेंडर हुवा’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.आलिया भट्ट व वरुण धवनच्या बद्रिनाथ की दुल्हनीया या चित्रपटातून चाहत्यांना जबरदस्त म्युझिक ट्रिटसह जबरदस्त डान्स पहायला मिळणार असल्याचे दिसते. ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’चे नवे गाणे ‘आशिक सरेंडर हुवा’ यात वरुण व आलिया डान्स करताना दिसत आहे. गाण्याचा सेट पाहून हे गाणे एका लग्न सोहळ्यातील आहे असे दिसते. या गाण्याचा शेवट फ्लॅशबॅकने करण्यात आल्याने या चित्रपटातील दृष्यांची व कथेची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशिक सरेंडर हुवा या गाण्याला अमला मलिक व श्रेया घोषाल यांनी गायले असून शब्दरचना शब्बीर अहमद यांनी केली आहे. तर संगीत अखिल सचदेवा यांनी दिले आहे. आतापर्यंत ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटातील चार गाणी रिलीज झाली असून त्यातील तीन गाण्यात डान्सचा जोरदार तडका लावण्यात आला आहे. माधुरी दीक्षित व संजय दत्त यांच्या ‘थानेदार’ या चित्रपटातील रिमिक्स क रण्यात आलेले ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणे म्युुझिक काऊंटडाऊनमध्ये हिट ठरले असून सध्या या गाण्याची सर्वाधिक स्ट्रिमिंग केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोेडक्शन व अपूर्व मेहता यांची निर्मिती असलेल्या ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान याने केले आहे. हा चित्रपट १० मार्चला रिलीज होणार आहे.