Join us

Bad News : दुसऱ्यांदा जुळ्या मुलांची आई बनलेल्या सेलिना जेटलीने गमविला आपला मुलगा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 13:43 IST

गेल्या बऱ्याच महिन्यापासून चर्चेत राहणारी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सेलिना जेटलीने १० सप्टेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी ...

गेल्या बऱ्याच महिन्यापासून चर्चेत राहणारी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सेलिना जेटलीने १० सप्टेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी एक मुलगा जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही. याची माहिती सेलिनाने दसऱ्याच्या दिवशी आपल्या फॅन्सला दिली.  सेलिनाने फेसबुकच्या व्हेरिफाइड फॅनपेजवरी लिहिले आहे की, ‘आज दसऱ्याच्या दिवशी एक चांगली आणि एक वाईट बातमी शेअर करायची आहे. १० सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आमच्या घरी परमेश्वराच्या कृपेने जुळ्या मुलांचा जन्म झाला. मात्र प्रत्येकवेळा आपण जसा विचार करतो तसे आपल्या आयुष्यात घडत नसते. आमचा मुलगा शमशेरला जन्मापासूनच सीरियस हार्ट प्रॉब्लेम होता आणि आता तो या जगात नाही राहिला, मात्र त्याचा एक भाग आर्थुर आमच्या सोबत आहे.’   जुलै महिन्याच्या सुरुवातीला सेलिनाचे वडील व्हि. के. जेटली यांचे निधन इंदौरमध्ये झाले होते आणि सप्टेंबरमध्ये सेलिनाने आपला बाळ गमविला. याचा उल्लेख करताना सेलिनाने लिहिले आहे की, ‘दोन महिन्याअगोदर वडिलांच्या निधनानंतर आता मी माझा बाळ गमविला आहे. हे माझ्यासाठी खूप दु:खद आहे. मात्र अंधाऱ्यानंतर प्रकाश नक्कीच येतो. आमच्या जवळ प्रकाशाच्या स्वरुपात आमचा मुलगा आर्थर जेटली हाग आहे, जो तुमच्या आशिर्वादाने नवीन आयुष्य सुरु करणार आहे. आपले प्रेम आणि नेहमीच्या समर्थनासाठी धन्यवाद!’सेलिना जेटलीने २००१ मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता आणि २००१ मध्ये झालेल्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत चौथ्या स्थानावर होती. सेलिनाने २००३ मध्ये ‘जानशीन’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय ती 'नो एंट्री', 'गोलमाल', 'टॉम डिक एंड हैरी' या चित्रपटातही दिसली आहे. तिने २०११ मध्ये बिजनेसमॅन पीटर हागशी लग्न केले आणि मार्च २०१२ मध्ये विराज आणि विंस्टन या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. आता ते पाच वर्षाचे झाले आहेत.   Also Read : ​Good news! सेलिना जेटली पुन्हा एकदा बनणार जुळ्या मुलांची आई