बच्चन पिता-पुत्राची क्रिकेटवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 16:01 IST
बच्चन कुटुंबीयांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. टीम इंडियाचे सामने ते वेळात वेळ काढून पाहतातच, पण सामन्यादरम्यान ट्विटवरून त्यांची 'कॉमेंट्री'ही सुरू ...
बच्चन पिता-पुत्राची क्रिकेटवारी
बच्चन कुटुंबीयांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. टीम इंडियाचे सामने ते वेळात वेळ काढून पाहतातच, पण सामन्यादरम्यान ट्विटवरून त्यांची 'कॉमेंट्री'ही सुरू असते. भारत जिंकल्यास धोनीसेनेवर कौतुकाचा वर्षाव करणारे बिग बी, पराभवानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार मात्र कधीच करीत नाहीत. टीम इंडियाचे कट्टर पाठीराखे असलेले क्रिकेट वेडे अमिताभ व त्यांचा मुलगा अभिषेक हे दोघेही महत्त्वाचा सामना असला की तो बघायला सोबतच जात असतात. शनिवारी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये रंगलेला भारत-पाक हाय व्होल्टेज सामना बघायलाही हे दोघे विमानाने एकत्र निघाले तेव्हा त्यांनी असा एक झक्कास फोटो काढून घेतला.