बेबी श्री अम्मा अय्यंगर अर्थात श्रीदेवीचे लहानपणापासून ते आतापर्यंतचे पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:36 IST
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाची बातमी केवळ बॉलिवूडसाठीच नव्हे तर तमाम चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. पुतण्या मोहित मारवाह याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ...
बेबी श्री अम्मा अय्यंगर अर्थात श्रीदेवीचे लहानपणापासून ते आतापर्यंतचे पाहा फोटो!
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाची बातमी केवळ बॉलिवूडसाठीच नव्हे तर तमाम चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. पुतण्या मोहित मारवाह याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवीने जगाचा अचानक घेतलेला निरोप अनेकांना ‘सदमा’ पोहोचविणारा आहे. काही तासांपर्यंत सामान्य जीवन जगणारी श्रीदेवी आता या जगात नाही, यावर अजुनही कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाºया श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट अखेरचा ठरला. या अगोदर २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवी बघावयास मिळाली होती. १९८३ मध्ये हिम्मतवाला या चित्रपटात रातोरात स्टार बनलेल्या श्रीदेवीने त्यानंतर मात्र कधीच वळून बघितले नाही. श्रीदेवीच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे.