Join us  

'बाहुबली : बिफोर दी बिगिनींग' प्रोजेक्ट पडला बंद, सहा महिने आणि १५० कोटी गेले पाण्यात; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 7:12 PM

Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टसाठी सर्वातआधी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. तर देव कट्टा या प्रीक्वलचं दिग्दर्शन करणार होता. पण आता ही वेब सीरिज मधेच थांबवण्यात आली आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' सीरिजने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती. या सिनेमाचं यश बघता नेटफ्लिक्सने या सिनेमाचा प्रीक्वल Bahubali: Before The Beginning नावाने बनवण्याची घोषणा केली होती. या प्रोजेक्टमध्ये मेकर्स बाहुबलीची आई शिवगामीची कहाणी दाखवणार होते. नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टसाठी सर्वातआधी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. तर देव कट्टा या प्रीक्वलचं दिग्दर्शन करणार होता. पण आता ही वेब सीरिज मधेच थांबवण्यात आली आहे.

या बिग बजेट वेब सीरिजवर १५० कोटी रूपये खर्च झाले आणि जवळपास ६ महिने कामही झालं. यासाठी हैद्राबादमध्ये एक मोठा सेटही तयार करण्यात आला होता. जिथे कामही सुरू झालं होतं. रिपोर्टनुसार, या सीरिजमध्ये मृणाल ठाकूरसोबतच अभिनेत्री वामिका गब्बी आणि साऊथची सुपरस्टार नयनतारा दिसणार होती. मीडिया रिपोर्टनुसार, Bahubali: Before The Beginning बाबत ज्याप्रकारे प्लानिंग करण्यात आलं होतं, ते अनेक प्रयत्न करूनही पूर्ण झालं नाही. प्लानिंगनुसार या सीरिजचं काम न झाल्याने मेकर्सनी ही सीरिज बंद करणं योग्य समजलं. 

दरम्यान, बाहुबलीमध्ये प्रभास, राणी दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, सत्यराज, नासर आणि सुब्बाराजू यांच्या मुख्य भूमिका होत्या. बाहुबलीला देशातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाचा प्रीमीअर ३९व्या मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता आणि याला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. असं मानलं जात आहे की, हा प्रोजेक्ट सध्या होल्डवर आहे आणि मेकर्स पुढे पुन्हा सुरू करण्याचा विचार करू शकतात. 

टॅग्स :बाहुबलीमृणाल ठाकूर