Join us

​अझहरूद्दीचा मुलगा अब्बास हिरो बनण्यासाठी सज्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 22:16 IST

एकीकडे भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलला ‘अजहर’ हा चित्रपट लवकरच रिलिज होणार असतानाच दुसरीकडे ...

एकीकडे भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलला ‘अजहर’ हा चित्रपट लवकरच रिलिज होणार असतानाच दुसरीकडे अझहरूद्दीचा मुलगा अब्बास अभिनय क्षेत्रातील एन्ट्रीसाठी सज्ज आहे. अब्बास लवकर ‘इदारिकी कोटेगा’ या तेलगू चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार असल्याची खबर आहे. सुरेश बाबू हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. यात अब्बास तीन अभिनेत्रींशी रोमान्स करताना दिसेल. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसा, दोन अभिनेत्रींची निवड झाली आहे. अन्य एका अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. तिचा शोध लागताच, या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.